Train Cancelled : 62 रेल्वेगाड्या रद्द, 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांचे होणार हाल
31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. चौथ्या मार्गाशी संबंधित सुरू असलेल्या कामामुळे 62 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूरमधून जाणार्या प्रमुख गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:
नागपूर: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या मार्गाशी संबंधित सुरू असलेल्या कामामुळे 62 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. नागपूरमधून जाणार्या प्रमुख गाड्या पुढीलप्रमाणे आहेत: आज, 21 ऑगस्टपासून 28 ऑगस्ट ट्रेन क्रमांक 12130/12129 हावडा-पुणे, 18109/18110 टाटा-इतवारी, 12810/12809 हावडा-सीएसएमटी , 12833/12809/12809 हावडा, अहमदाबाद-12809/12809 -शालीमार कोलकाता रद्द होईल. तसेच 12262 हावडा-सीएसएमटी दुरांतो 22,23, 24, 26 ऑगस्ट, 12261 सीएसएमटी-हावडा दुरांतो 23, 24, 25, 28 ऑगस्ट, 12222 हावडा-पुणे दुरांतो 20, 25, 27 ऑगस्ट, पुणे-1222 तसेच 29 ऑगस्ट, 22846 हटिया - पुणे 22, 26, 29 ऑगस्ट, 22845 पुणे - हटिया 24, 28, 31 ऑगस्ट, 12880 भुवनेश्वर -एलटीटी 22, 25, 29 ऑगस्ट, 12879 एलटीटी - भुवनेश्वर 24,27, 31 रोजी धावणार नाहीत. त्याचप्रमाणे 20822 संत्रागाछी-पुणे हमसफर एक्सप्रेस 20, 27 ऑगस्ट, 20821 पुणे-संत्रागाची 22 आणि 29 ऑगस्ट रोजी रद्द राहतील. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Nagpur : वर्षात चारवेळा होणार पुनरिक्षण, 'या' तारखांना वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना करता येणार नोंदणी
ब्रॉडगेजच्या कामाला तत्त्वतः मान्यता, इतवारी-नागभीड ब्रॉडगेज काम सुरू
नागपूरः दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे इतवारी-नागभीड ब्रॉडगेज मार्गाचे काम सुरू आहे. या रेल्वे मार्गाच्या कामात कांपा- चिमूर-वरोरा मार्गाचा समावेश करावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने केला आहे. कांपा-वरोरा दरम्यान रेल्वे मार्ग झाल्यास या संपूर्ण परिसराचे अर्थकारण बदलणार आहे. याशिवाय लगतच्या भागाचा झपाट्याने विकास होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांपा चिमूर वरोरा ब्रॉडगेजच्या कामाला तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याने चिमूर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
परिसरातील समृद्धी वाढणार
कांपा- चिमूर- वरोरा भागात रेल्वे मार्ग अस्तित्वातच नाही. मात्र हा मार्ग झाल्यास वरोऱ्यावरून दक्षिणेकडे जाणारा मार्ग व नागभीडकडून हावडाकडे जाणारा मार्ग जोडल्या जाणार आहे. याच परिसर सर्वाधिक खनिज संपत्ती असल्याने हा परिसरातील समृद्धी वाढणार आहे. याशिवाय हा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर खनिज प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन मिळणार आहे. ताडोबा पर्यटन स्थळाला येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे.
RSS शस्त्रसाठा माहिती ; जिल्हा व सत्र न्यायालयाची नागपूर पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला
759 कोटी रुपये राज्य सरकार देणार
मुख्यत: या नव्या रेल्वे मार्गाने परिसरातील अर्थकारण बदलणार आहे. कांपा- चिमूर-वरोरा मार्गासाठी 1518 कोटी रुपये खर्च येणार असून 759 कोटी रुपये देण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे.