एक्स्प्लोर

Nagpur : वर्षात चारवेळा होणार पुनरिक्षण, 'या' तारखांना वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना करता येणार नोंदणी

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया 1 ऑक्टोबर पासून सुरु असून प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर प्रसिध्द होणार आहे.

नागपूर: वर्षभरात चारवेळा मतदार याद्यांचे विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या तारखांना वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार नोंदणी करता येणार आहे. 1 जानेवारी, 1 एप्रिल,1 जुलै, 1 ऑक्टोबर या तारखांना पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल. ऑनलाईन नोंदणी केल्यास त्याचा लाभ मतदारास लवकर मिळतो. त्यासाठी राज्य निवडणूक विभागाच्या मोबाईल ॲपचा वापर करावा व मतदार नोंदणी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. यासोबत मतदार छायाचित्र अपडेट करण्यात  राज्यातील महानगरात नागपूर प्रथम असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. 

मतदार यादीशी आधार क्रमांक करा 'लिंक'

मतदार यादीशी आधार क्रमांक जोडणी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघच्या मतदार यादीत नाव नोंदणी कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिनल कळसकर, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसिलदार राहूल सारंग तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदार पुनरिक्षण कार्यक्रम वर्षातून चारदा होणार असल्यामुळे मतदारांनी नमूना 6-ब भरुन नाव नोंदणी, वगळणी व इतर बदल करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. 

महिला मतदारांची संख्या कमी

काही तालुक्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे. महिला मतदारांच्या संख्या वाढीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. राजकीय पक्षांनी मतदान कार्डशी आधार संलग्न करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी सहकार्य करावे. आधार संलग्न मतदान कार्ड करणे हे ऐच्छिक असून त्यामुळे एकाच मतदाराचे नाव विविध मतदार संघात असल्यास ते कळेल व एकच व्यक्तीसाठी एकच मतदान कार्ड राहील, त्यासोबतच मतदाराची ओळख प्रस्थापित होऊन मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण होईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. आधार संलग्न मतदार कार्ड करणे हे महत्वाचे आहे. या मोहीमेस सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

NMC Elections : विविध उपक्रमांद्वारे प्रभागात माहोल निर्मितीला सुरुवात, नोव्हेंबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत

शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकांसाठी...

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया 1 ऑक्टोबर पासून सुरु असून प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर प्रसिध्द होणार आहे. 1 नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारीत शिक्षक मतदार संघासाठी शिक्षकांनी  मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे  त्यांनी सांगितले. मतदान नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि रितीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली  प्रत्येक व्यक्तींचा आधार क्रमांक मतदार यादीशी संलग्न करण्यात येईल. आधार जोडणीसाठी नमूना क्रमाक 6-ब  भरुन देण्यात यावा. ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र 6-ब ERO Net, GARUDA, NVDP, VHA  या माध्यमांवर देखील उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

Nagpur : मद्यार्काची 'पुष्पा स्टाईल' तस्करी, दोन हजार लिटर 'स्पिरिट' जप्त

घरोघरी देणार भेट

आता वर्षातून चार वेळा हे शिबीर घेण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम घरोघरी भेट देवून राबविण्यात येणार आहे. शंभरटक्के मतदारांशी संपर्क साधून त्यांचेकडून 31 मार्च 2023  पूर्वी नमूना अर्ज क्र. 6-ब मध्ये आधार क्रमांक उपलब्ध करुन घेण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, मतदारांनी आधार क्रमांक उपलब्ध करुन द्यावा, हे या मोहिमेचे मूलभूत तत्व आहे. राजकीय पक्षांनी याबाबत जनतेत जनजागृती करावी व या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर व उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी केले. यावेळी अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याविषयावर चर्चा केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Embed widget