मोठी बातमी: नागपूरच्या दोन भागातील संचारबंदी पूर्णत: उठवली, कुठे शिथिलता, कुठे जैसे थे, वाचा सविस्तर
दोन पोलीस ठाणा हद्दीतील कर्फ्यू पूर्णत: उठवला असून काही भगाात ४ तासांचाी शिथिलता देण्यात आली. तर काही भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

Nagpur: नागपुरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला. प्रचंड तोडफोड जाळपोळ झाल्याने पोलिसांसह नागरिकही जखमी झाले. दंगलीनंतर या दंगलीत प्रमुख सहभाग असणाऱ्या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नागपुरात हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. याबबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. नागपुरात दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली असून काही भागात 4 तास शिथिलता देण्यात आली आहे. हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. (Curfew)
कोणत्या भागात संचारबंदी कशी?
18 तारखेला रात्री सुरू झालेल्या संचारबंदी आज 20 तारखेच्या दुपारपासून म्हणजे आजपासून दुपारी 2 वाजता पासून नदनवन आणि स्टेशन कपिल नगर या ठिकाणी संचारबंदी पूर्णतः उठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर शांतीनगर, पाचपावली, लकडगंज , सक्करदरा, इमामवाडा, या भागात दैनंदिन जीवनात लोकांच जनजीवन सुरळीत राहावे यासाठी आढावा घेऊन आज पासून दोन वाजता पासून सायंकाळी 6 पर्यंत चार तासाकरिता शिथीलता देण्यात आली आहे. कोतवाली तहसील आणि गणेश पेठ या भागात हिंसाचार झाला होता त्यामुळे या पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत जशास तसा सुरू राहणार असल्याचंही प्रशासनाने सांगितले.
जाळपोळ, गाड्यांची तोडफोड, मोठे नुकसान
नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या राड्यात दोन्ही गटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सय्यद जलील यांचं नागपूरच्या हंसापुरी भागात गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये ग्राहकांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या 7 कार उभ्या होत्या. दंगलखोरांनी त्या सर्व गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. शेजारी असलेल्या दुसऱ्या वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. हंसापुरी परिसरात दोन गॅरेज मधील एकूण 13 वाहनांची तोडफोड झाली. भारतात इतके दंगे झाले. मात्र, नागपूर कधी अशी स्थिती नव्हती. हे बघून आम्हाला पण धक्का बसला, अशी प्रतिक्रिया सय्यद जलील यांनी दिली. नागपूरच्या हंसापुरी भागात देखील मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली. एकाच परिसरात 15 वाहनांची जाळपोळ करण्यात आली . यात आशा खोब्रागडे यांच्या एकट्यांच्या घरच्या 3 दुचाकी जाळण्यात आल्या. ठराविक समुदायांच्या घरांना ठरवून लक्ष केल्याचा आरोप आशा खोब्रागडे यांनी केला.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

