Nagpur: मेट्रो सिटी म्हणवणारे नागपूर अद्याप ब्रिटिशांच्या पॅटर्नवर अवलंबून; नेहमी उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीचे VNITच्या प्राध्यापकाने सांगितले कारण
Nagpur Heavy Rain: नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेने नागपूरमध्ये नेहमी उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर (Heavy Rain in Nagpur) संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनात काही धक्कदायक निरीक्षणे पुढे आली आहे.

Nagpur Heavy Rain: नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेने नागपूरमध्ये नेहमी उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर (Heavy Rain in Nagpur) संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनात काही धक्कदायक निरीक्षणे पुढे आली आहे. आपल्याकडे कोणत्याही विकासकामाचे किंवा शासकिय योजनेचे नियोजन करतांना पावसाच्या रेन फॉलऑफसाठी (जमिनीवरून पाणी वाहत जाण्याचे प्रमाण) जे मानक वापरले जातात ते 1865, 1910 व 1930 मध्ये ब्रिटिशांनी तयार केलेले मानक आहे, तेच आज आपण वापरत आहे. तेव्हाची परिस्थिती व आजची परिस्थिती यात खूप अंतर आहे. मात्र आपण रेन ऑफ मानकात कोणताही बदल स्वीकारला नाही, आपल्याकडे नवीन मानक व त्याची सूत्रे तयार आहे, मात्र ती पद्धत क्लिष्ट व खर्चिक असल्याने आपल्याकडे त्याचा कोणी विचार करत नसल्याचे संशोधनत पुढे आल्याची माहिती विश्वेशरया अनुसंधान संस्थेच्या जल संधारण अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक डॉ अविनाश वासुदेव (Dr. Avinash Vasudev) यांनी दिली.
हायड्रोलिक सर्कल पूर्णत: डिस्टर्ब, संशोधनत आलं कारण पुढे
दरम्यान, आपल्याकडील नवीन ड्रेनेज स्टिस्टीम व स्ट्रॉमवॉटर सिस्टिम जुन्या मानकानुसार तयार करण्यात येत असल्याने ते पावसाच्या पाण्यात निकामी ठरत आहे. दुसरी महत्वाची गोष्टी हायड्रोलिक सर्कल म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ होण्यापासून तर पाऊस म्हणून ते पुन्हा समुद्रात येणाऱ्यापर्यंत एक सायकल आहे. ते पूर्ण व्हायला काही महिन्याचा काळ लागतो. मात्र आपण हायड्रोलिक सर्कलला पूर्णत: डिस्टर्ब केल्याचे संशोधनत पुढे आले आहे. विशेषकडून वाहत्या पाण्याची नैसर्गिक वाट अडवणे, शहरी भागात पाणी जमिनीत झिरपण्याच्या प्रक्रियेला पूर्णता छेद देणे, नैसर्गिक वॉटर बॉडी नामशेष करणे, या गोष्टीचा समावेश आहे. त्यामुळे पावसात पाणी वस्त्यांमध्ये तुंबून राहते, रस्ते जलमय होत असल्याचे संशोधनात पुढे आल्याचे डॉ अविनाश वासुदेव यांनी सांगितले.
अजून खूप काम करण्याची गरज- डॉ.अविनाश वासुदेव
सध्या पावसाचा पॅटर्न बदलला आहे. मात्र त्यासाठी आपण तयार नसल्याचेही ते म्हणाले. बदलत्या पावसाच्या पॅटर्न नुसार आपण नवीन विकास काम करतांना विचार करत नसल्याचे ते म्हणाले. ड्रिनेज सिस्टीम, स्ट्रॉमवॉटर , कचरा विल्हेवाट यावर अजून खूप काम करण्याची गरज असल्याचे ही डॉ.अविनाश वासुदेव यांनी सांगितले. या सोबतच हायड्रोलिक सर्कलला घेवून नागरिकांमध्ये जागृतीचा अभाव आहे. त्यामुळे मागच्या काही काळापासून आपल्याकडे दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे ही प्राध्यापक डॉ अविनाश वासुदेव यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
























