एक्स्प्लोर

प्रेमविवाहानंतर मुलगा झाला, पण सहलीत पत्नीचं दुसऱ्याशी सूत जुळलं, प्रियकराच्या साथीने मुलाला घेऊन पसार, पतीची कोर्टात याचिका

अॅड. स्वप्ना कोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली असून न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं यावर मंगळवारी सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे.

मुंबई: वडाळा टीटी पोलिसांना तीन वर्षांचा मुलगा सापडत नसल्यानं त्याच्या वडिलांनी आता हायकोर्टाचं दार ठोठावलं आहे. आपल्या मुलाला हजर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अॅड. स्वप्ना कोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली असून न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं यावर मंगळवारी सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे.

10 जून 2024 रोजी आपला मुलगा घराबाहेर खेळत होता. अचानक त्याचा आवाज बंद झाला. बाहेर येऊन बघितलं तर पत्नी व तिचा प्रियकर आपल्या मुलाला घेऊन पळत होते. आपण त्यांचा पाठलाग केला पण ते काही हाती लागले नाहीत. याची वडाळा टीटी पोलिसांत तक्रार दिलेली आहे, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.

नेमकं प्रकरण काय?

साल 2016 मध्ये नवरात्री उत्सवात झालेल्या भेटीनंतर या दांपत्यानं विवाह करण्याचा निर्णय घेतला. साल 2017 मध्ये लग्नानंतर ते सायनमध्ये वास्तव्यास होते. पुढे साल 2021 मध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर एका सहली दरम्यान पत्नीची एका पुरूषासोबत ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री वाढत गेली. त्यावर आपण आक्षेप घेत ही बाब सासू-सासऱ्यांच्या कानावर घातली पण त्यानं काहीच फरक पडला नाही. एकेदिवशी अचानक पत्नी तिच्या या प्रियकरासोबत पळून गेली.पण नंतर ती परत आली आणि तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. मात्र काहीदिवसांत ती तिथूनही निघून गेली, अशी माहिती या याचिकेतून नमूद करण्यात आली आहे.

आईनेचं पोटच्या गोळ्यांना संपवलं-

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या दोन्ही मुलांना आईनेच संपवल्याची धक्कादायक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. आईनेच प्रियकराच्या साथीने मिळून दोन मुलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. सुमारे दोन महिन्यानंतर पोलिसांना दोन्ही मुलांच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. आईच आपल्या मुलांच्या जीवावर उठली असल्याचं या घटनेत समोर आलं असून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याचा संशय गावकऱ्यांना आलेला होता. आता दोन महिन्यानंतर या दोन संख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर, घातपात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. धक्कदायक बाब म्हणजे आपल्या प्रेमात अडथळा असणाऱ्या मुलांना जनमदात्या आईने आणि तिच्या प्रियकरानेच शेततळ्यात ढकलून संपविल्याचं एका साक्षीदाराच्या साक्षीने उघड झालं आहे. 

आणखी वाचा

पुण्यात ‘फादर्स डे’च्या दिवशी बाप झाला हैवान, चार वर्षाच्या चिमुरडीला चाकूचे चटके देत शारीरिक अत्याचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget