एक्स्प्लोर

..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?

मुंबई: महापौरपदासाठी एक-एक सदस्य महत्वाचा असताना, अरुण गवळी यांच्या कन्या आणि अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. मात्र यासाठी शिवसेनेत अपक्ष फोडण्यासाठी सुरु असलेली अंतर्गत चढाओढच जबाबदार असल्याचं कळतंय. शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी गेली दहा वर्ष गीता गवळी यांनी सेनेला पाठींबा दिला होता. गीता गवळी यांच्याशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी गेली बारा वर्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होती. गेली दोन टर्म महापालिका निवडणुकीत आणि एकदा विधानसभा निवडणुकीत नार्वेकर यांच्या मध्यस्थीने गीता गवळी यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. मात्र यंदा महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत असल्याने पहिल्यांदा गवळींविरोधात शिवसेनेने अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला होता. तरीही गीता गवळी शिवसेनेशी वाटाघाटी करण्यास तयार होत्या. उद्धव ठाकरे यांची गीता गवळी यांच्याशी फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांची सेनाभवन येथे भेट करून देतो असं आश्वासन देऊन एकनाथ शिंदे यांनी गवळी यांना शिवसेनाभवनात बोलवून घेतले. मात्र उद्धव ठाकरे सेनाभवनात नव्हते हे कळल्यावर गीता गवळी संतापल्या. त्याचबरोबर मीडियाची उपस्थिती ही त्यांना फारशी रुचली नाही. त्यामुळे गवळी यांची एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यासोबतची बोलणी फिस्कटली आणि त्या सेनाभवनातून परतल्या. ठाण्यात एकहाती सत्ता आणल्यानंतर मुंबईचा महापौर बसवण्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव करण्यास एकनाथ शिंदे यांनी कमालीचा सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेतील इतर नेते आणि मंत्री अस्वस्थ झालेत. महापौर बसल्यावर राज्य सरकारचं भवितव्य ठरणार असं शिवसेनेतील नेत्यांकडून सांगितलं जातंय आणि म्हणूनच अपक्ष फोडून आपली कामगिरी दाखवण्याचा सेनेतील नेत्यांचा प्रयत्न सुरु आहेत. मात्र अपक्षांना फोडण्यासाठी सुरु झालेली सेनेतली चुरस यावेळी मात्र भाजपच्या पथ्यावर पडली. त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अखेर गीता गवळी यांनी गेली दहा वर्षांची शिवसेनेची साथ सोडली आणि भाजपच्या गोटत सामिल झाल्या. शिवसेनेत कोणी कोणता अपक्ष फोडला? 1) वॉर्ड क्र 41 - तुळशीराम शिंदे - मालाड (प) : एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री 2) वॉर्ड क्र 62 - चंगेज मुलतानी - अंधेरी (प) : विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री 3) वॉर्ड क्र 123 - स्नेहल मोरे - घाटकोपर (पू) : विनायक राऊत, खासदार 4) वॉर्ड क्र 160 - किरण लांडगे - कुर्ला (प) : हाजी अरफात शेख, मिलिंद नार्वेकर संबंधित बातम्या
शिवसेना-भाजप एकत्र येतील, याची 200 टक्के खात्री : पाटील
LIVE: उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी
महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

chandrashekhar bawankule एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील, बावनकुळेंची माहितीKalyan Dombivali : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्याचा हैदोस, पोलिसांवर दगडफेकDevendra Fadnavis : लहानपणीच्या खोडकर आठवणी ते राजकारण देवाभाऊंच्या सख्या बहिणी ExclusiveMahayuti Oath Ceremonyमहायुती 2.O सरकारचा शपथविधी,सागर बंगल्याबाहेर 'महाराष्ट्र थांबणार नाही'चे बॅनर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Eknath Shinde & Devendra Fadnavis: वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये फडणवीस-शिंदेंमध्ये नेमकी काय डिल झाली? गृहखात्याच्या मोबदल्यात शिवसेनेला कोणतं महत्त्वाचं खातं मिळणार?
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये नेमकी कोणती डिल झाली? शिवसेनेला गृहखात्याच्या मोबदल्यात कोणतं खातं मिळणार?
Embed widget