एक्स्प्लोर

Nalasopara Buildings Demolition : नालासोपाऱ्यातील अवैध इमारतींवर आज महापालिकेचा हातोडा, अनेक कुटुंब होणार बेघर, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Nalasopara Buildings Demolition : नालासोपाऱ्यातील डपिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बनवण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई केली जात आहे.

नालासोपारा : येथील डपिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बनवण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतींपैकी 10 इमारतीवर याआधी तोडक कारवाई (Nalasopara Buildings Demolition) करण्यात आली होती. आज सोमवारी (दि.27) रितू पॅलेस या चार मजली इमारतीवर आज महापालिका हातोडा मारणार आहे. तोडक कारवाईच्या भीतीने इमारतीतील रहिवासी स्वतः आपले सामान खाली करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे 30 एकरचा मोठा भूखंड असून काही भूखंड खासगी तर काही भूखंड कचराभूमी आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित होता. 2006 साली ही जमीन माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी बळकावली. यानंतर 2010 ते 2012 या कालावधीत या जमिनीवर बनावट बांधकाम परवानगी (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) बनवून 41 अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या होत्या. 

पुन्हा तोडक कारवाईला सुरुवात

या 41 अनधिकृत इमारतीत दोन हजारांहून अधिक कुटुंबियांचे वास्तव्य असून मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने या इमारती अनधिकृत ठरवून पालिकेला कारवाईचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेने याआधी 41 अनधिकृत इमारतींपैकी 10 इमारती भुईसपाट केल्या. कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, सीआरपीएफ अशी सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. या कारवाईमुळे इमारतीत राहणारी शेकडो कुटुंब बेघर झाली असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. तर काही रहिवाशांना कारवाई सुरू होताच अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले होते. आता शिल्लक 31 इमारतीवर आजपासून (दि. 27) पुन्हा तोडक कारवाई केली जाणार आहे. 

रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

आज रितू पॅलेस या चार मजली इमारतीवर आज महापालिका हातोडा मारणार आहे.  कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. तोडक कारवाईच्या भीतीने रहिवासी स्वतः आपले सामान खाली करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमचे घर तुटणार या भीतीने नालासोपारा पूर्व परिसरातील हजारो कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nitesh Rane: मिरकरवाड्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई; पोलिसांचा फौजफाटा तैनात, नितेश राणेंनी दिले होते आदेश

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh : Akshay Shinde व  Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुयAkash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोपABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सVijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Embed widget