Vijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा
Vijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा
भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनीकेली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी,जनतेला दिलासा द्यावा दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकार मध्ये गंमत जंमत सुरू आहे हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे