एक्स्प्लोर

बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉईड औषधांचं सेवन, वसईतील तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी

अॅब्ज बनवण्यासाठी किंवा चांगली शरीरयष्टी कमावण्यासाठी अनेक जण व्यायाम करतात तर काही व्यायामासोबत औषधांचंही सेवन करतात. परंतु औषधांचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. स्टेरॉईड औषधं खाल्ल्याने वसईतील 37 वर्षीय समीर साखरेकर यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.

वसई : सध्या प्रत्येक तरुणाला आपली शरीरयष्टी अभिनेत्यांप्रमाणे असावी असं वाटतं. अॅब्ज बनवण्यासाठी अनेक जण जिमला जातात, काही औषधांचं सेवन करतात. पण या औषधांचा शरीरावर किती विपरित परिणाम होऊ शकतो याचं उदाहरण मुंबईजवळच्या वसईत पाहायला मिळालं. समीर साखरेकर यांना अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवायची होती. त्यासाठी जिमचे ट्रेनर आणि आणि मित्रांनी सुचवलेलं औषध खाल्ल्यामुळे, आज त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.

37 वर्षीय समीर साखरेकर यांची अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवण्याची इच्छा. त्यासाठी ते जिममध्ये प्रचंड मेहनतही करत होते. समीर साखरेकर 2013 पासून जिममध्ये जाऊन व्यायाम करत आहेत. फुगीर मसल्स म्हणझे बॉडी फिट असा त्यांचा समज होता. बॉडीबिल्डरप्रमाणे आपल्याही शरीराचा आकार व्हावा यासाठी समीर साखरेकर यांनी जिम ट्रेनर तसंच मित्रांच्या सांगण्यावरुन फेब्रुवारी 2019 पासून स्टेरॉईड असलेली औषधं घेण्यास सुरुवात केली. समीरने इंजेक्शन, औषधे घेतली. त्यात टेस्टॉन, बोल्डी, जीएच यांसह काही फॅट बर्नर्स देखील होते. यातील बहुतांश इंजेक्शनमध्ये स्टेरॉईड मोठ्या प्रमाणात होते.

औषधं घेतल्यानंतर समीर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यासाठी ते काही काळ रुग्णालयातही दाखल झाले होते. त्यावेळी ते बरे होऊन घरी परत आले होते. पण काही महिन्यांतच म्हणजे मे पासून, त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. त्यांच्या शरीराला सूज आली, चालताही येत नव्हतं. अखेरीस त्यांना समजलं की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. 9 जुलैपासून त्यांचं डायलिसिस सुरु झालं. आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावं लागत आहे. समीर साखरेकर हे त्यांच्या घरातील एकमेव कमावते होते. त्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात आज त्यांचे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आहेत. घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. अशास्थितीत या गंभीर आजारपणाशी तोंड कसे देणार हा प्रश्न त्यांच्या घरच्या पुढे आहे.

समीर यांचं वय 37 वर्ष आहे. या वयात त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर आयुष्यभर त्यांना डायलिसिस करावं लागेल. तसंच त्यांचं शरीर कमकुवतच राहिलं तर सतत इतर दुसरे लहान मोठे आजार होत राहतील. त्यामुळे प्रत्यारोपण करणे गरजेचं आहे. यासाठी त्यांना 10 ते 12 लाखांचा खर्च येणार आहे. संपूर्ण कुटुंब समीर साखरेकरांवर अवलंबून असल्यामुळे ते पैशांची जुळवाजुळव करत आहे. मात्र सरकारने, स्वयंसेवी संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जमेल तशी मदत करण्याचे आवाहन साखरेकर कुटुंबीय करत आहेत.

स्टेरॉईड सेवनाचे परिणाम स्टेरॉईडच्या सततच्या सेवनामुळे शरिरावर विपरीत परिणाम होऊ लागतो. स्टेरॉईडच्या गुणवत्तेवरही आणि सेवनाच्या प्रमाणावर आजार होणं अवलंबून असतं. मात्र याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडे ठिसूळ होणे, डोळे कमजोर होणे, हेपेटायटीस होणे, छातीत दुखणे, निद्रानाश इत्यादी आजार होतात. तसेच मानसिक ताण येतो. मूड स्विंग्ज होतात, चीडचीड होते, भावनांवरील नियंत्रण सुटते इत्यादी त्रास सुरु होतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election Exit Poll : केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यताCity 60 News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 05 Feb 2025 : ABP MajhaDelhi Vidhan Sabha Election Exit Poll : बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाजSuresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि  गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
Embed widget