एक्स्प्लोर
तोल जाऊन पडल्याने टँकरखाली चिरडला, वसईत चिमुरड्याचा मृत्यू
निषादचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला आणि अनवधानानं टँकरच्या चाकाखाली आला. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
वसई : उशीर झाला म्हणून शाळेने प्रवेश नाकारला. त्यामुळे गोविंद घाडी आणि त्यांचा मुलगा निषाद घराकडे निघाले. वाटेत गोविंद काही कामासाठी एका दुकानावर थांबले, तर निशाद बाईकजवळच थांबला. मात्र त्याच वेळात होत्याचं नव्हतं झालं.
निषादचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला आणि अनवधानानं टँकरच्या चाकाखाली आला. सगळ्यांची धावपळ सुरु झाली. निषादला रुग्णालयातही नेलं, पण त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.
कुठल्या हॉस्पिटलकडे निषादवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती मेडिकल सामग्री नव्हती तर कुणाकडे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. निषादच्या आईने मात्र डॉक्टरांनीच दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.
जर शाळेत प्रवेश मिळाला असता तर... त्यानंतर डिलीव्हरीसाठी त्यांचे वडील थांबले नसते तर... प्रत्येक हॉस्पिटलने उपचारासाठी नकार दिला नसता तर... या जर-तरला आता काही अर्थ नाही. पण प्रश्न कायम आहे... निषादच्या मृत्यूला जबाबदार कोण?
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement