एक्स्प्लोर

मोदी सरकार विद्यार्थ्यांसाठीही शाप, NEET पेपर फुटीमुळे 23 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा; वर्षा गायकवाडांचा आरोप

Varsha Gaikwad : काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पेपर फुटीविरोधात कठोर कायदा करणार असल्याचं मुंबई उत्तर मध्यच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी आश्वासन दिलं. 

मुंबई: मोदी सरकारने तरुणांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन फसवले, नोकर भरती केली नाहीm परीक्षा देऊन भविष्य उज्वल करु पाहणाऱ्या लाखो मुलांच्या स्वप्नावरही सातत्याने पाणी फेरण्यात आले. आता NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने 23 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबrयांच्या स्वप्नांचा चुराडा आणि विश्वासघात केला असा आरोप मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि मुंबई उत्तर मध्यच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केला.

मोदी सरकार विद्यार्थांसाठीही शाप ठरले आहे असा घणाघाती हल्ला करत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करण्याची काँग्रेसची गॅरंटी आहे असा विश्वास मुंबई  प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदी सरकारने 10 वर्षांत विद्यार्थ्यांसाठी काहीही केलेले नाही. मोदी सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत आजचा तरुण वर्ग चुकवत आहे. शिक्षण क्षेत्रालाही धार्मिक रंग देण्याच्या नादात भाजपा सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा केला आहे. उत्तर प्रदेशात पोलीस भरतीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले, या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला शेवटी जनतेचा रोष लक्षात घेऊन योगी सरकारला नमते घ्यावे लागले. महाराष्ट्रातही तलाठी भरतीचा पेपर फुटला असताना गृहमंत्री फडणवीसांनी मात्र तपास करण्याऐवजी पुरावे मागण्याचा निर्लज्जपणा केला. भाजपा सरकारमुळे तरुण पिढीचे अतोनात नुकसान झाले आहे. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा बनवून करोडो प्रामाणिक तरुणांचे भविष्य वाचवण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे.

मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भूषण पाटील यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी वाकोला, सांताक्रुज पूर्व येथील व्यापारी व स्थानिक रहिवाशी यांच्याशी संवाद साधला. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास चौक ते मॅच फॅक्टरी तसेच कुर्ला विधानसभा मतदारसंघातील पंचशील नगर ते पंढरीनाथ सेवा मंडल अशी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आणि भाजपच्या  उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे. तर एमआयएमकडूनही शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यात आला आहे

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sanjay Raut Letter to CM: संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget