गतवेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली, 11 मतदारसंघात 62 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक मतदान तर बारामतीत मतदानात 9 टक्क्यांची घसरण
Maharashtra Voting Percentage 2024 : राज्यातील 11 मतदारसंघात यंदा 61.44 टक्के मतदान झालं असून देशातील 93 मतदारसंघात 62.27 टक्के मतदान झालं आहे.
मुंबई : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राज्यातील मतदानाच्या आकडेवारीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात 61.44 टक्के मतदान झालं असून सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झालं आहे. कोल्हापूरमध्ये 70.35 टक्के मतदान झालं आहे तर हातकणंगलेत 56 टक्के मतदान झालं आहे. राज्यात सर्वाधिक कमी मतदान हे बारामतीमध्ये झालं आहे. बारामतीमध्ये 56.07 टक्के मतदान झालं.
कोल्हापुरात यंदा काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यात लढत होती. तर शेजारच्या हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत होती. या दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान जरी झालं असलं तरी कोल्हापूरमध्ये गतवेळच्या तुलनेत मतांची टक्केवारी घटली आहे.
बारामतीतील हाय व्होल्टेज लढतीकडे सर्वांचंच लक्ष असलं तरी त्या ठिकाणच्या मतदारांनी मात्र निरुत्साह दाखवल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये 50.06 इतकं मतदान झालं होतं. यंदा त्यामध्ये जवळपास 9 टक्क्यांची घट झाली असून 56.06 इतक्यावर ते घसरलं आहे.
राज्यातील मतदानाची एकूण आकडेवारी
राज्य- 61.44 टक्के मतदान
- लातूर- 60.18 (2019 - 65.06)
- सांगली- 60.95 (2019 - 65.06)
- बारामती- 56.07 (2019 - 65.06)
- हातकणंगले - 68.07 (2019 - 65.06)
- कोल्हापूर- 70.35 (2019 - 65.06)
- माढा- 61.17 (2019 - 65.06)
- उस्मानाबाद - 60.91 (2019 - 65.06)
- रायगड- 58.10 (2019 - 65.06)
- रत्नागिरी- सिंधुदुर्ग - 59.23 (2019 - 65.06)
- सातारा- 63.05 (2019 - 65.06)
- सोलापूर- 57.61 (2019 - 58.60)
देशातील एकूण आकडेवारी - 62.27 टक्के
- आसाम- 76.13
- बिहार- 57.27
- छत्तीसगड- 68.15
- दादरा नगर हवेली- 65.23
- गोवा- 74.50
- गुजरात- 57.00
- कर्नाटक- 69.14
- मध्यप्रदेश- 64.82
- महाराष्ट्र- 56.37
- उत्तरप्रदेश- 57.34
- पश्चिम बंगाल- 73.93
राज्यातील प्रमुख लढती
रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत आहे.
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत होत आहे.
साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज अशी लढत आहे.
सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत आहे.
माढ्यात भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत आहे.
बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा नणंद-भावजय सामना आहे.
हातकणंगलेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील विरूद्ध शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे.
ही बातमी वाचा: