एक्स्प्लोर
भाजी चांगली न झाल्याचा वाद, बापाकडून मुलाची हत्या
उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरातील शास्त्रीनगर भागात शांताराम उज्जैनकर हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास होते.

उल्हासनगर : भाजी चांगली न झाल्याच्या रागातून झालेल्या वादात बापानं मुलाची हत्या केल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरातील शास्त्रीनगर भागात शांताराम उज्जैनकर हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास होते. रविवारी संध्याकाळी त्यांची सून रेखाने घरी स्वयंपाक केला. मात्र त्यातली भाजी शांताराम यांना न आवडल्याने त्यांनी सुनेला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्यांचा मुलगा कृष्णा मध्ये पडला असता शांताराम यांनी त्यालाही मारहाण करत त्याचा गळा दाबला आणि तोंडावर उशी दाबून त्याचा खून केला. याप्रकरणी सून रेखाच्या तक्रारीनंतर मध्यवर्ती पोलिसांनी शांतारामविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या सगळ्या प्रकाराने उल्हासनगरमध्ये खळबळ माजली आहे.
आणखी वाचा























