Uddhav Thackeray | मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार, असा निर्धार देवेंद्र फडणवीस वारंवार व्यक्त करत असतात. मात्र आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आणि विद्युत बसच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती.
त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या कामाची स्तुती करताना उद्धव ठाकरेंनी पुढचं सरकार आपलं असणार असं वक्तव्य केलं. त्यानंतर थोडं थांबून पुढचा.... आणि पुन्हा थोडं थांबून थेट उपस्थितांनाचा प्रश्न विचारला. पुढचं तुम्हाला काय ते कळलं असेल? असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे भाजपनंतर शिवसेनेनंही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरु केली.
आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी कधीच त्यासंदर्भात थेट वक्तव्य केलेलं नाही. जनतेच्या मनात असेल तर आपण मुख्यमंत्री व्हायला तयार आहोत, अशी प्रतिक्रियाही आदित्य यांनी दिली होती. मात्र आज उद्धव ठाकरेंच्या यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या 'मन की बात' त्यांनी बोलून दाखवली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
संबंधीत बातम्या