एक्स्प्लोर

मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड यांना केवळ समज दिली आहे. मीडियाशी बोलू नये, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी रवींद्र गायकवाड यांना दिली आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारल्यानंतरही शिवसेना रवींद्र गायकवाड यांच्या पाठीशी उभी राहिल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंनी गायकवाड यांना केवळ समज देऊन सोडलं आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी वर्तन चांगलं असावं अशी सूचना केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस तपास सुरु असेर्यंत पक्ष गायकवाड यांच्यावर सध्यातरी कोणतीही कारवाई करणार नाही. मागील आठवड्यातील संबंधित प्रकारावर उद्धव ठाकरेंनी रवींद्र गायकवाड यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. परंतु गायकवाड यांनी अजून लेखी स्वरुपात ते सादर केलं नाही. मात्र गायकवाड यांनी त्यांची बाजू पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं. रवींद्र गायकवाड सचिव किंवा शाखाप्रमुख नाहीत, त्यामुळे त्यांना पदावरुन पायउतार होण्यास सांगू शकत नाही. ते संसदेचे खासदार असून पक्षाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यामुळे पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना पक्षातून निलंबित करु शकत नाही. सध्याच्या घडीला आम्ही फक्त त्यांना समज देऊ शकतो आणि वर्तनाकडे लक्ष देण्यास सांगू शकतो, असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं. दरम्यान रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवास नाकारणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचे खासदार आज हक्कभंग आणण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार अशाप्रकार कोणत्याही प्रवाशाला तिकीट नाकारता येत नाही, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. काय आहे प्रकरण? उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला. VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे. … म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड ‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली. गायकवाड यांची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली. पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कानउघडणी केली. कोण आहेत रवींद्र गायकवाड? – रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत – लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला. – उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत – रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते. – दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे. – तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला. संबंधित बातम्या खा. रवींद्र गायकवाड अधिवेशनाला हजेरी लावणार? चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाडांवर 'अमूल'चा चित्रातून निशाणा गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार … म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane : सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेट 18-19 दिवसांपूर्वी, थोडं थांबा, गुपित बाहेर येईल; बजरंग सोनवणेंचा दावा
सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेट 18-19 दिवसांपूर्वी, थोडं थांबा, गुपित बाहेर येईल; बजरंग सोनवणेंचा दावा
कॉमेडियन समय रैनाच्या अडचणी आणखी वाढल्या,  न्यायालयाने 'इंडियाज गॉट लेटेन्ट'बाबत घेतला मोठा निर्णय!
कॉमेडियन समय रैनाच्या अडचणी आणखी वाढल्या, न्यायालयाने 'इंडियाज गॉट लेटेन्ट'बाबत घेतला मोठा निर्णय!
Lipstick: जगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली, कोणी पहिल्यांदा वापरली?
जगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली, कोणी पहिल्यांदा वापरली?
Places of Worship Act : देशातील प्रार्थनास्थळ कायद्याशी संबंधित 7 याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली
देशातील प्रार्थनास्थळ कायद्याशी संबंधित 7 याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 17 February 2025Paragliding For exam : पेपरला उशीर, घाटात ट्रॅफिक जॅम; पॅराग्लायडिंगने पोहोचला परीक्षा केंद्रावरVaibhav Naik Meets Uddhav Thackeray : वैभव नाईक मातोश्रीवर, ठाकरेंसोबत करणार चर्चाKrushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Sonwane : सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेट 18-19 दिवसांपूर्वी, थोडं थांबा, गुपित बाहेर येईल; बजरंग सोनवणेंचा दावा
सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेट 18-19 दिवसांपूर्वी, थोडं थांबा, गुपित बाहेर येईल; बजरंग सोनवणेंचा दावा
कॉमेडियन समय रैनाच्या अडचणी आणखी वाढल्या,  न्यायालयाने 'इंडियाज गॉट लेटेन्ट'बाबत घेतला मोठा निर्णय!
कॉमेडियन समय रैनाच्या अडचणी आणखी वाढल्या, न्यायालयाने 'इंडियाज गॉट लेटेन्ट'बाबत घेतला मोठा निर्णय!
Lipstick: जगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली, कोणी पहिल्यांदा वापरली?
जगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली, कोणी पहिल्यांदा वापरली?
Places of Worship Act : देशातील प्रार्थनास्थळ कायद्याशी संबंधित 7 याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली
देशातील प्रार्थनास्थळ कायद्याशी संबंधित 7 याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली
धक्कादायक! ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF च जमा होईना
धक्कादायक! ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF च जमा होईना
व्यवसाय सुरू करण्याआधी 5 गोष्टी लक्षात घ्या!
व्यवसाय सुरू करण्याआधी 5 गोष्टी लक्षात घ्या!
Nashik Politics : महायुतीत श्रेयवादाची लढाई; अजितदादांनी भूमिपूजन केलेल्या कामाचं एकनाथभाईंकडून पुन्हा भूमिपूजन? नेमकं काय घडलं?
महायुतीत श्रेयवादाची लढाई; अजितदादांनी भूमिपूजन केलेल्या कामाचं एकनाथभाईंकडून पुन्हा भूमिपूजन? नेमकं काय घडलं
Shiv Sena UBT : कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; चर्चांना उधाण
कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; चर्चांना उधाण
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.