(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खा, प्या आणि कलटी मारा... Tinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम, दोन तासाच्या डेटसाठी 50 ते 60 हजाराचे बील
हॉटेलचे आलेले किमान 45 ते 50 ते 60 हजाराचे बिल मात्र पीडिताच्या खिशातून हॉटेल मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी असणारे बाऊन्सर वसूल करत असे.
मुंबई : एकटेपणा माणसाला खाऊ लागतो अशावेळी एकटेपणा दूर करण्यासाठी तरुणांसोबत अनेक लोक हल्ली डेटिंग ॲपचा वापर करतात. मात्र टिंडर या डेटिंग या ॲपवर ओळख झालेल्या तरुणींच्या मदतीने शेकडो तरुणांना गंडवण्याचा (Mumbai Fraud News) प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला गोड गोड बोलणारी 'डेट' नंतर त्या तरुणांना (Dating App) चांगलीच गोत्यात आणत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. या डेटिंग ॲपच्या माध्यमातून खा, प्या आणि कलटी मारा... असा नवीनच स्कॅम उघडकीस आला आहे.
सध्या मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या द रेड रूम आणि गॉड फादर नावाच्या हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. टिंडर या ॲपच्या माध्यमातून ओळख झालेली तरुणी ही तरुणांना द रेड रूम किंवा गॉडफायदार सारख्या हॉटेलमध्ये भेटायला बोलावून त्या ठिकाणी अवघ्या तास दोन तासातच महागडे पेय किंवा खाद्यपदार्थ ऑर्डर करून खाऊन पिऊन झाल्यावर काहीतरी कारण सांगून त्या ठिकाणाहून तरुणी कलटी मारून पळून जातात. हॉटेलचे आलेले किमान 45 ते 50 ते 60 हजाराचे बिल मात्र पीडिताच्या खिशातून हॉटेल मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी असणारे बाऊन्सर वसूल करत असे.
हॉटेलचा नेमका रोल काय?
मात्र टिंडर ॲपवर ओळख झालेल्या तरुणीचा नंतर नंबर देखील लागत नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच काही तरुणांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर या संदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत. सध्या याप्रकरणी आंबोली पोलिसांकडून ते ॲप कोण ऑपरेट करत आहे त्यात कोणकोणत्या मुली सहभागी आहेत आणि हॉटेलचा नेमका रोल काय याचा तपास सुरू आहे.
अॅप 13 भाषांमध्ये उपलब्ध
भारतात Tinder, Bumble, Badoo, woo सारख्या अॅप्सची लोकप्रियता प्रचंड आहे. Tinder हे Dating App भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या Dating सर्विसला वर्ष 2012 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि हे 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
हे ही वाचा :
अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती फसवणूक