सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
ही पानं फुफ्फुसांसाठी चांगली असून सूज, गळू यासाठी विडयाच्या पानाचं सेवन करण्यास सांगितलं जातं.
Benefits of Nagveli Leaves: जेवण झालं की अनेकजण पानाचा विड्याचं पान आवर्जून खातात. नागवेलीची ही पानं पचनासाठी अत्यंत आवश्यक असून सर्दी खोकल्यासह अनेक आजार पळतात. तोंडाची चव वाढवण्यासह अनेक जीवाणूंचा प्रभावी सामना करण्यासाठी विड्याचं पान अत्यंत फायद्याचं आहे. आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पती म्हणून विड्याच्या पानाची ओळख आहे. हे सदाहरित व बहुवर्षायू वेल आहे. नागवेलींचं शास्त्रीय नाव पायपर बिटल आहे. विड्याची पाने किंवा खाऊची पान असेही म्हणतात.
यासाठी ओळखली जातात विड्याची पानं
तहान शमवण्यासाठी तसेच मस्तकातील रक्ताधिक्य कमी करण्यासाठी विड्यांच्या पानांचा उपयोग होतो. डोके दुखत असल्यासही विड्याची पानं खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळं आयुर्वेदिक खोकल्याच्या औषधांमध्ये विड्याच्या पानांचा समावेश असतो. ही पानं फुफ्फुसांसाठी चांगली असून सूज, गळू यासाठी विडयाच्या पानाचं सेवन करण्यास सांगितलं जातं.पाने सुगंधी, पाचक, उत्तेजक असून योग्य पदार्थ घालून केलेला विडा, दोन्ही जेवणानंतर खाल्ल्यास नक्कीच आरोग्यास फायदा होतो असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.
आवाजासाठी विड्याचं पान उपयुक्त
आवाज बसला असेल किंवा खोकल्यानं गळा कोरडा पडला असेल तर विड्याचं साधं पान खाण्याचा सल्ला देण्यात येतो. यात टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइड्स सारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्याला अनेक प्रकारे लाभ देतात. बहुतेक लोक विड्याच्या पानात सुपारी, तंबाखू, चुना इत्यादी मिसळून सेवन करतात. पानाचे अशा प्रकारे सेवन करणे घातक ठरते. त्यामुळे या गोष्टी वगळून फक्त साधे पान खाल्ले पाहिजे.
सामान्य रोगांवर रामबाण
सर्दी, ऍलर्जी, डोकेदुखी किंवा शरीराच्या कोणत्याही भागात सूज किंवा दुखापत यांसारख्या सामान्य समस्येवर विड्याचे पान प्रभावी ठरते. विड्याच्या पानासोबत मधाचे सेवन केल्यास सर्दी-खोकल्याह अनेक समस्या दूर होतात. काही दुखापत झाल्यास सुपारीच्या पानांचे सेवनाने जखमा लवकर भरून येण्यास मदत होते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )