अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती फसवणूक
अलिबागमधील एका रिसॉर्टमधून अमेरिकेतल्या नागरिकांना फसवून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटण्याचा प्रकार समोरं येताच रायगड पोलिसांनी हा प्रकार उलथून लावला.
मुंबई : दिवसागणिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहेत, बदलत्या काळानुसार झालेली डिजिटल क्रांती मानवालाच घातक ठरत आहे. गुन्हेगारीला सध्याचा झालेला डिजिटल बदल मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याच उघड झालंय. अलिबागमधील कॉल सेंटरच्या (Alibag Call Center) माध्यमातून सुरु असलेला हा प्रकार सुध्दा अशाच माध्यमातून सुरू असल्याच समोर आलंय. अलिबागमधील एका रिसॉर्टमधून अमेरिकेतल्या नागरिकांना फसवून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटण्याचा प्रकार समोरं येताच रायगड पोलिसांनी हा प्रकार उलथून लावला.
अलिबाग तालुक्यामधील परहूर येथील नेचर्स एज या रिसॉर्टमधून मागील काही दिवसांपासून अमेरिकेतल्या पर्यटकांना गंडा घालण्याचे काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जात होते. अलिबाग पोलिसांनी ऑनलाईन जुगार अड्डयाच्या संशयातून घातलेल्या या धाडसत्रात हा प्रकार उघडकीस आला.गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली.यात पन्नासहून अधिक तरुणांचा सामावेश असल्याच उघड झालंय.अमेरिकेतून पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना सेक्ससाठी गोळ्या औषधे,काही उपकरणे पुरविणे शिवाय त्यांचे आमिष दाखवणे असा व्यवसायच या टोळीने उभारला होता.त्यांची आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरद्वारे फसवणूक केली जात होती.
रिसॉर्टवर रात्री धाड
नशेच्या पदार्थांचे सेवन करून रात्री उशिरापर्यंत हे कॉल सेंटर सुरू असायचे.मात्र अलिबाग पोलिसांना या रिसॉर्टमध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याचा संशय आला. त्यासाठी पोलिसांनी गुरूवारी या रिसॉर्टवर रात्री धाड टाकली. या धाडीत वेगळाच प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबतीत अधिक चौकशी केली असता हे आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर असल्याचे उघड झाले. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यासंदर्भात माहित देत या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं सांगितले.
जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट तपासणी करणार
अलिबाग मधील नेचर्स एज या रिसॉर्ट मधील एकूण 12 खोल्या या टोळीने घेतलेल्या पोलिस तपासात निदर्शनात आलेल्या आहेत.रिसॉर्ट मधील वेटरला हे आरोपी तब्बल 300 रुपयांची टीप द्यायचे.त्यामुळें येथील रिसॉर्ट स्टाफ शी यांची चांगली गट्टी जमली होती.या प्रकरणातील सर्व आरोपी हे परराज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे .मागील सहा महिन्यांपासून हा रॅकेट सुरू होता. मात्र आता अनेक रिसॉर्टच्या बाबतीत आम्ही योग्य तपासणी करू अशी माहिती रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
हे ही वाचा :