Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलेलं पाहायला मिळालय, इंदापूर आणि अकोल्यात मुलं बुडाली आहेत.
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीला इंदापूर आणि अकोल्यात गालबोट लागल्याचं पाहायला मिळालंय. अकोल्यात आणि इंदापुरात गणेश विसर्जनासाठी गेलेले मुलं बुडाली आहेत.
इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नीरा नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाल्याची घटना दुपारी घडली. अनिकेत विनायक कुलकर्णी असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. मुलाच्या शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रशासन प्रयत्न करीत आहे. इंदापूरचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, घटनास्थळी दाखल झाले आहेत. नीरा नरसिंहपूर येथे वेद अध्यायन शिकविणाऱ्या पाठशाळेत अनिकेत कुलकर्णी हा शिकत होता. गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात तो इतर मुलांसह गेला असता सदरची दुर्दैवी घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल होत असून, होडीतून व पाण्यात बुड्या घेऊन सदर मुलाच्या सध्या शोध घेतला जात आहे.
अकोल्यात सलग दुसर्या दिवशी गणेश विसर्जनादरम्यान बुडून एकाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी गणेश गायकवाड या 18 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झालाय. गणेश हा अकोला शहरातील अकोटफैल भागातील रहिवासी आहेय. आज दुपारनंतर गणेश हा आईसोबत घरगुती गणेशाचंवविसर्जन करण्यासाठी म्हैसांग इथे पूर्णा नदीवर गेला होताय. गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडालाय. तातडीने विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला नदीबाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलेय. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. काल बाळापूर तालूक्यातील भिकूंडखेड येथे गणेश विसर्जनादरम्यान भिकूंड नदीत बुडून एकाचा मृत्यू झालाय.
कोल्हापुरात लेझर शो वर बंदी असताना मिरवणूक
लेझर शो वर बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर
लेझर शो मुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली होती
त्यानंतर पोलिसांनी बंदी घातली होती
पण पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळल्या नाहीत.
गेल्या कित्येक वर्षापासून वसईत हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपली जात आहे. वसईत ईद ए मिलाद चा कार्यक्रमा निमित्त मुस्लिम बांधवांनी गणेशोत्सव विसर्जनाच्या मार्गावर विसर्जनासाठी निघालेल्या गणेशभक्तांसाठी खाद्य आणि पाणी ची व्यवस्था केली आहे. ईद ए मिलाद च्या या कार्यक्रमात कोणतही मुस्लिम धर्मियांच गाण न लावता चक्क गणपतीची गाणी लावली जात आहेत. गणेशभक्तांची सेवा केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात