एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोनाची लक्षणं जाणवणाऱ्या संशयितांची घरीच चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय
कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगाने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका घरीच कोरोना संशयितांची कोविड 19 ची चाचणी घेणार आहे. लवकरच या संदर्भात हेल्पलाईन क्रमांक सुरू होणार आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुरुवातील विदेशातून आलेल्या लोकांना याची लागण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही याची बाधा झाल्याच्या घटना समोर येत आहे. परिणामी कोरोना संशयितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका कोविड 19 ची चाचणी घरीच उपलब्ध करुन देणार आहे. दरम्यान, मुंबईत सर्वाधिक 39 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर, त्यामुळे राज्य सरकारसह पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. मुंबई महानगर पालिका संशयित रुग्णांची कोविड-19 ची चाचणी करण्यासाठी नवीन दूरध्वनी क्रमांक सुरु करीत आहे. ही सुविधा पुढील दोन दिवसांत सुरू होणार आहे. सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरण (कॉरंटाईन) सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे त्यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) संस्थेने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये कोविड चाचणी उपलब्ध आहे. हे हेल्पलाईन क्रंमाक कार्यान्वित झाल्यानंतर, हेल्पलाईन वरील डॉक्टर संशयित रुग्णाची पूर्ण माहिती घेतील आणि गरज असल्यास कोविड चाचणी करण्याचा सल्ला देतील. चाचणी नमुना घरी येऊन घेणे आणि तपासणीसाठी ICMR संस्थेने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठवणे यासाठी समन्वय करून देतील. त्यामुळे आता घरच्या घरीच आता कोरोनाची चाचणी होणार आहे. सरकारचा मोठा निर्णय! राज्यात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा जमावबंदीनंतर आता राज्यात संचारबंदी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याचसाठी सरकारने रविवारी राज्यात जमावबंदी जाहीर केली. मात्र, तरीही लोकांची गर्दी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यात कोरोना विषाणू जास्त पसरू नये म्हणून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरुच राहणार आहेत. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला राज्यात कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचा आकडा आता वेगाने वाढताना दिसत आहे. बातमी लिहताना हा आकडा 97 पर्यंत पोहचला आहे. यात मुंबईत सर्वाधिक 42 कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिघेही मुंबईतील आहेत. coronavirus | देशांतर्गत विमानसेवा 25 मार्चपासून बंद पिंपरी चिंचवड मनपा – 12 पुणे मनपा – 15 मुंबई – 42 नागपूर – 4 सांगली - 4 यवतमाळ – 4 नवी मुंबई – 4 कल्याण – 4 अहमदनगर – 2 रायगड – 1 ठाणे – 1 उल्हासनगर – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 सातारा - 1 CM Uddhav Thackeray | Curfew in Maharashtra | राज्यात आजपासून संचारबंदी : उद्धव ठाकरे यांची घोषणा
आणखी वाचा























