एक्स्प्लोर
बारावीचे 65 लाख पेपर तपासणीशिवाय पडून, शिक्षकांचं आंदोलन सुरुच
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 जून पूर्वी 12 वीचा निकाल लागणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांना अर्थमंत्री दाद देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून मार्ग काढावा, असे संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांच्या मागण्याबाबतचे आंदोलन अधिकच चिघळत चालल्याचे चित्र आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरु झाली असून अद्याप एकही पेपर महविद्यालयातील प्राध्यापकांनी तपासला नाही. त्यामुळे बारावीचे 65 लाख पेपर तपासणीविना पडून आहेत.
शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने 12 वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आज सहाव्या दिवशीही सुरूच राहिल्यामुळे राज्यात आजपर्यंत एकही पेपर तपासण्यात आला नाही व पेपर तपासणीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
शासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीचे आदेश न काढल्यास व आंदोलन अधिक लांबल्यास 12 वीच्या निकालावर परिणाम होईल व त्याची संपूर्ण जबाबदारी मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढणाऱ्या शासनाचीच असेल, असे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 जून पूर्वी 12 वीचा निकाल लागणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांना अर्थमंत्री दाद देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून मार्ग काढावा, असे संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ही संघटनेनं दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement