एक्स्प्लोर
उद्योगमंत्री सुभाष देसाईंची मंत्रीपदाची झूल उतरवण्याची तयारी
शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवत आपल्याला पक्षात काम करायला आवडेल, अशी भावना व्यक्त केली आहे.
मुंबई : शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवत आपल्याला पक्षात काम करायला आवडेल, अशी भावना व्यक्त केली आहे. सुभाष देसाईंचा अमृतमहोत्सवी सोहळ्याचा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को मैदानात काल मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी ही तयारी दर्शवली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी देसाई यांच्या यांचं चरित्रही प्रकाशित करण्यात आलं.
यावेळी सुभाष देसाई म्हणाले की, शिवसेनेनं सगळं काही दिलं. आता ही मंत्रिपदाची झूलही उतरवावी. गाडीवरील लाल दिवा काढून घेतल्यामुळे आता मंत्री राहण्यात काय अर्थ आहे? असं सांगत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी सामना दैनिकावरुन एकमेकाला चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, सुभाष देसाई यांनीही सामनामध्ये रोखठोक लिहलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement