एक्स्प्लोर

'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास ठरावावरुन शिवसेनेने 'सामना'तून थेट मुख्यमंत्र्यांवर वार केला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमता आदर करावा, असं म्हणत, तुकाराम मुंढेंवरील अविश्वास ठराव तातडीने मंजूर करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला शिवसेनेने दिला आहे. तुकाराम मुंढेंविरोधात 104 तर बाजूने 6 मतं पडली आहेत. त्यामुळे लोकशाहीत बहुमताला किंमत असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल, असं 'सामना'त म्हटलं आहे. 'सामना'तील काही भाग जसाच्या तसा नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. मुंढे यांच्या विरोधात १०४ तर बाजूने फक्त ६ मते पडली. लोकशाहीत बहुमताला किंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी एकमुखाने मुंढे यांच्या विरोधात उभे ठाकले असतील तर सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल. भारतीय जनता पक्षाच्या फक्त सहा नगरसेवकांना मतदानाचे स्वातंत्र्य दिले असते तर त्यांनीही मुंढेविरोधाचा षटकार ठोकलाच असता. राज्य ग्रामपंचायतीचे असो नाही तर विधानसभा आणि लोकसभेचे, ते बहुमतावरच चालते. तुकाराम मुंढे हे धडाडीचे किंवा प्रामाणिक, सचोटीचे असतीलही, पण राज्यात आणि देशात तेच एकमेव सचोटीचे आहेत असे सांगणे हा इतर प्रामाणिक अधिकार्‍यांचा अपमान आहे. मुंढे यांनी नवी मुंबईकरांच्या हिताची अनेक कामे तडाखेबंद पद्धतीने केली असेही सांगितले जात आहे. महापालिका आयुक्त या नात्याने त्यांनी काही कामे केलीही असतील, पण याचा अर्थ लोकशाही मार्गाने निवडून आलेले नगरसेवक जनहिताची कामे धडाडीने करीत नाहीत असे कसे म्हणता येईल? शिवाय मुंढे यांनी जी काही कामे केली त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सर्व पक्षीय नगरसेवकांचे जे आरोप आहेत, त्यांच्या वर्तणुकीसंदर्भात जे आक्षेप आहेत ते चुकीचे कसे ठरतात? मुंढे यांनी गेल्या पाच महिन्यांत शुभारंभाचे नारळ फोडून १५ रुपयांच्याही कामांचा शुभारंभ झाला नाही, फेरीवाले, प्रकल्पग्रस्तांवर अन्यायकारक कारवाई केली, मनमानी कारभार करून लोकप्रतिनिधींना डावलले असे अनेक आक्षेप मुंढेविरोधात स्थानिक नगरसेवकांनी घेतले आहेत. त्यांचेही उत्तर मुंढे यांनी द्यायला हवे. खरे तर मुंढे जेथे गेले तेथे त्यांच्यावर अशी वेळ आली. त्यामुळे त्यांनीच या गोष्टीचे आत्मपरीक्षण करायला हवे. एखाद्या ‘डॉन’ किंवा ‘रॉबिनहुड’प्रमाणे वागून लोकप्रियता मिळविल्यानेच अधिकारी चांगला ठरतो असे नाही. ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त जयस्वाल हे कोणताही गाजावाजा न करता काम उत्तम व धडाकेबाज पद्धतीने करीत आहेत. तेसुद्धा मुख्यमंत्र्यांच्याच खास मर्जीतले असल्याची बातमी आहे. मुंढेही मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतलेच असल्याचे बोलले जाते, पण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आहोत म्हणून कसेही वागण्याचा व मनमानी करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो व त्याने घटना व कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचे असते. लोकप्रतिनिधींच्या कुंडल्या काढून त्यांना अडचणीत आणायचे व स्वत:चा धडाकेबाजपणा सिद्ध करायचा हे योग्य नाही. स्वत: मुख्यमंत्री विरोधकांशी विनम्रतेने वागतात व तेवढा संयम हा ठेवायलाच हवा. संबंधित बातम्या आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Embed widget