निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय झालेना नाही. त्यामुळं सेंट्रल मार्डने (Central MARD) आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय झालेना नाही. त्यामुळं सेंट्रल मार्डने (Central MARD) आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील निवासी डॉक्टर नियमित वैद्यकीय, शैक्षणिक आणि जीव वाचवण्याशी संबंधित नसलेल्या सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामुळे नियमित बाह्यरुग्ण विभाग (OPD), नियमित आंतररुग्ण सेवा (IPD), वॉर्ड राऊंड, नियोजित शस्त्रक्रिया, नियोजित वैद्यकीय प्रक्रिया, शैक्षणिक उपक्रम, सेंट्रल लॅब सेवा आणि फिव्हर ओपीडी बंद राहणार आहे.
रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सेंट्रल मार्डने स्पष्ट केले आहे. कॅज्युअल्टी, ट्रॉमा केअर, अतिदक्षता विभाग (ICU), प्रसूतीगृह, आपत्कालीन शस्त्रक्रिया, आपत्कालीन प्रयोगशाळा (E-Lab), रक्तपेढी तसेच जीव वाचवण्यासाठी आवश्यक सर्व सेवा सुरू राहतील. वारंवार निवेदने, बैठका आणि चर्चेनंतरही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याची वेळ आल्याचा दावा सेंट्रल मार्डने केला आहे. तसेच निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने समाधानकारक निर्णय घेऊन नियमित आरोग्यसेवा पूर्ववत करावी, अशी मागणीही राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
राज्यात आज अनेक ठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. BMC रुग्णालयांतील नियमित OPD सेवा आजपासून बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. KEM, नायर, सायन आणि कपूर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी देखील संपाचा निर्णय घेतला आहे. CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांनी MMC नोंदणी देण्याच्या विरोधात डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट पासून डॉक्टरांच्या संपाला सुरुवात झाली आहे. रुग्णाचे हाल होऊ नयेत म्हणून संपाच्या पहिल्या 24 तासात आरात्कालीन सेवा आणि अपघात विभाग अशा जीव वाचवणाऱ्या सर्व सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सरकराच्या भूमिकेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल… असं देखील सांगण्यात आलं आहे. 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार (GR) एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या होमियोपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी (आधुनिक वैद्यकशास्त्र) प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात डॉक्टरांनी एक दिवसाचा वैद्यकीय सेवा बहिष्कार जाहीर केला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास तातडीने आणीबाणी सेवा देखील बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?




















