सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
जर मी सावजी खाल्लं तर एक महिना हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, असे वक्तव्य तुकाराम मुंढेंनी एका कार्यक्रमात आरोग्यविषयक माहिती देताना केले होते.

मुंबई : सध्या राज्यभरात तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) कारवाईचा धडाका सुरू असून राज्यात अॅनालॉग पनीवर बंदी घालण्यात आली आहे. पुढील 1 वर्षांच्या कालावधीसाठी ही बंदी असल्याचे सांगत तुकाराम मुंढेंनी आजच्या पत्रकार परिषदेत अन्न व औषध विभागाच्या कारवाईची माहिती दिली. यावेळी, अमरावती येथील एका कार्यक्रमात त्यांनी नागपुरातील (Nagpur) सावजी जेवणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरील प्रश्नावरही परखडपणे भूमिका मांडली. माझं वक्तव्य नीट ऐका, ते व्यक्तिगत होतं. त्यामुळे, माझ्या वक्तव्यावर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असेही मुंढेंनी स्पष्ट केले.
जर मी सावजी खाल्लं तर एक महिना हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, असे वक्तव्य तुकाराम मुंढेंनी एका कार्यक्रमात आरोग्यविषयक माहिती देताना केले होते. त्यानंतर, नागपूरमधील सावजी हॉटेल चालकांनी तुकाराम मुंढेंच्या या वक्तव्याचा विरोध दर्शवला. तसेच, तुकाराम मुंढेंनी आमच्या घरी यावे, आम्ही त्यांना सावजी खाऊ घालू, असे निमंत्रणही दिले होते. तसेच, 'सावंजी हा केवळ पदार्थ नसून आमची परंपरा आहे', असे सांगत तुकाराम मुंढेंनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी देखील हलबा उद्योजकांनी केली होती. त्यावरही, तुकाराम मुंढेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही
माझं वक्तव्य पुन्हा ऐकावं, ते जर खाल्लं तर 1 महिना मी आजारी पडेन असं माझं वक्तव्य होतं. दुसरे आजारी पडतील असं म्हटलेलं नाही, कुणी खा किंवा नका खाऊ असं म्हटलेलं नाही, असे स्पष्टीकरण तुकाराम मुंढेंनी दिलं. सन 2008-09 मला एका मित्राने ओढून नेलं होतं, बघूनच मला ते जास्त लाल दिसलं होतं, त्यावेळी एक घास खाल्ला आणि मी उठलो. कारण, मला ते तेलकट, तिखट वाटलं. मात्र, मी कुणी खाऊ नये असं म्हटलं नाही, असा किस्साही तुकाराम मुंढेंनी सांगितला. माझं वक्तव्य वैयक्तिक होतं, कोणी खावं आणि कोणी खाऊ नये याबद्दल मी काही म्हटलं नाही. त्यामुळे, माझ्या वक्तव्यावर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात तुकाराम मुंढेंनी सावजी संदर्भात
10 ते 6 हीच वेळ होऊ शकत नाही
संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लॅबमधील लोकांना सुट्टी मिळत नाही, असा आरोप करत अनेकांनी तुमच्याविरुद्ध तक्रार केल्यासंदर्भात तुकाराम मुंढेंना विचारण्यात आलं होतं. त्यावर, लॅब 24 तास चालते याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करायचं. दररोज आठ तास, आठवड्याला 48 तास काम करणं अपेक्षित आहे, एक दिवस साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे, त्यांची पहिली मागणी चुकीची आहे, 10 ते 6 हीच वेळ कामाची असं देखील होऊ शकत नाही, त्यांचे गैरसमज दूर होतील, असे उत्तर तुकाराम मुंढेनी दिलं.
तिथंच परवाना जप्तीची कारवाई करतो
आम्ही सुधारणा नोटीस न देता थेट परवाना रद्द करतो, असं म्हणणं चुकीच आहे. जिथे फूड सुरक्षित नव्हतं, लोकांच्या जीवाला धोका होता तिथेच फक्त परवाना जप्तीची कारवाई झाल्याची माहिती मुंढेंनी दिली. जो कारवाईशी संतुष्ट नाही त्याने माझ्याकडे अपील करायला हवी हेच कायदा सांगतो असंही ते म्हणाले. परवाना निलंबितांच्या 165 पैकी 103 आस्थापनांनी अपील केलं आहे. उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, फोटो, व्हिडिओ आहेत, कायदेशीररीत्या आम्ही बरोबर आहोत, असेही मुंढेंनी म्हटले.
हेही वाचा






















