एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भाजपवर टीका
'राहुलच्या ताटात काय होते हे त्यांनाच माहीत, पण भाजपच्या पोटात गोळा आला आहे आणि तो मांसाहारी आहे, हे नक्की.'
मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या येथील अनेक मंदिरांना भेटी देत आहेत. याचवरुन भाजपने वेगवेगळ्या प्रकारे राहुल गांधींवर टीका सुरु केली आहे. पण केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेनं मात्र, पुन्हा एकदा 'सामना'तून भाजपवरच टीका केली आहे.
'राहुलच्या ताटात काय होते हे त्यांनाच माहीत, पण भाजपच्या पोटात गोळा आला आहे आणि तो मांसाहारी आहे, हे नक्की.' अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.
कर्नाटक दौऱ्यावर असणारे राहुल गांधी दुपारच्या जेवणानंतर देवळात गेले. मात्र, त्यांनी ‘मांसाहार' करुन दर्शन घेतल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला. त्यावरुन आता काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं सामनातून भाजपवरच टीकेची झोड उठवली आहे.
एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर :
* दुपारच्या जेवणानंतर राहुल गांधी देवळात गेले. मात्र त्यांनी ‘मांसाहार’ करून दर्शन घेतल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला. काँग्रेसकडून या आरोपाचे खंडन लगेच केले गेले व शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण त्या दुपारी राहुल गांधी यांनी घेतल्याचे पुरावे वगैरे दिले गेले. निवडणूक प्रचारात असे मुद्दे येणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. राहुलच्या ताटात काय होते हे त्यांनाच माहीत, पण भाजपच्या पोटात गोळा आला आहे आणि तो मांसाहारी आहे, हे नक्की.
* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये ‘भाजप’ परिवाराची झोप उडवली. आता कर्नाटकातही गुजरातचीच पुनरावृत्ती घडते की काय असे एकंदर चित्र आहे. गुजरातमधील अनेक मंदिरांना राहुल गांधी यांनी भेटी दिल्या. पूजाअर्चा केल्या. भजन-कीर्तनातही ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यावेळी भाजपवाल्यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली. कारण राहुल गांधींनी हिंदुत्वाचा स्वीकार केला तर आपले कसे व्हायचे ही चिंता त्यांना वाटत असावी. काँग्रेसने Soft Hinduism स्वीकारून भाजपास गुजरातेत कोंडीत पकडले. सध्या कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपच्या सभांचा धुरळा उडत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात राहुल गांधी गुजरातप्रमाणे कर्नाटकातही दर्गा, मशिदींबरोबरच अनेक मंदिरांना भेटी देत असल्याने भाजपवाले खवळले आहेत.
* माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पांना तर भयंकरच संताप आला आहे. मांसाहार करून राहुल गांधी देवळात गेल्याचा आरोप येडियुरप्पांनी केला आहे. निवडणूक दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी कोप्पल जिल्हय़ातील कनकछाला नरसिंह स्वामी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. दुपारच्या जेवणानंतर राहुल गांधी देवळात गेले. मात्र त्यांनी ‘मांसाहार’ करून दर्शन घेतल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला. काँग्रेसकडून या आरोपाचे खंडन लगेच केले गेले व शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण त्या दुपारी राहुल गांधी यांनी घेतल्याचे पुरावे वगैरे दिले गेले. निवडणूक प्रचाराची पातळी किती खाली घसरत आहे याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.
* कुणाच्याही धार्मिक भावना व श्रद्धांना ठेच लागू नये, पण कुणाच्या ताटातही कुणी उगाच डोकावू नये. प्रत्येक मंदिरांच्या, धर्मस्थळांच्या काही रूढी, परंपरा आहेत. महाराष्ट्रात काही देवतांना ‘मांसाहारी’ नैवेद्याची प्रथा आहे व ती कटाक्षाने पाळली जाते. देव काही कोंबडे-बकरे मागत नाही आणि तूप, पुरणाची पोळी, श्रीखंडही मागत नाही, मात्र निवडणूक प्रचारात असे मुद्दे येणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
* इंदिराजी शाकाहारी होत्या की मांसाहारी या वादात पडण्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे महत्त्वाचे. ‘शाकाहार’ व ‘धर्मप्रेमी’ येडियुरप्पांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सीमा भागातील मराठी भाषिकांचे रक्त सांडले, डोकी फोडली. हा हिंसाचार व दडपशाही म्हणजे ‘मांसाहार’च होता! पण बोलायचे कोणी?
संबंधित बातम्या :
काश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलात फुटला : शिवसेना
राजस्थानच्या पोटनिवडणुकीवरुन शिवसेनेचा भाजपवर निशाणा
शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement