एक्स्प्लोर
Advertisement
युतीची बोलणी फिस्कटली, शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव
मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्या युतीसंदर्भातील शेवटची बैठक आज पार पडली. पण या बैठकीत भाजपकडून देण्यात आलेला 114 जागेंचा प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला असून शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे युतीबाबतच्या तिसरी बैठकीतही तणाव कायम होता. दोन्ही पक्षांनी एकमेकांचा प्रस्ताव नाकारल्यानं आता युती तुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील तिसऱ्या बैठकीतील बोलणी फिस्कटली असून शिवसेननं भाजपचा प्रस्ताव फेटाळला आहे.
LIVE UPDATE- आज शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी आशिष शेलारांची भेट घेतली.
LIVE UPDATE- महायुतीच्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली पाहिजे यावर मेटे आणि शेलार यांचं एकमत झालं.
भाजपकडून शिवसेनेला 114 जागेंचा प्रस्ताव: आशिष शेलार
या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, 'आमच्याकडून 114 प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आला. तर शिवसेनेकडून 60 जागेंचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे यापुढे याबाबत चर्चा न करणं योग्य होईल. असं दोन्हीकडील नेत्यांना वाटतं. म्हणून यापुढील जागावाटपाबाबतची चर्चा आता वरिष्ठ पातळीवर केली जाईल.ट
शिवसेनेची ताकद आणि जनाधार वाढल्यानं 60 जागेंचा प्रस्ताव: अनिल देसाई
दरम्यान, याबाबत शिवेसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले की, 'बदललेली परिस्थिती आणि शिवसेनेचा वाढलेला जनाधार यामुळे आम्ही भाजपला 60 जागांचा प्रस्ताव दिला. विधानसभा निवडणूक नंतर शिवसेनेची ताकद वाढली. आम्ही जी काम केली त्यामुळे जनाधार वाढला त्यामुळे 60 जागा दिल्या. पण जागावाटपावर आता चर्चा होणं शक्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयानंतर गरज पडल्यास आम्ही पुन्हा चर्चा करु.'
दरम्यान, तिसऱ्या बैठकीनंतर भाजप आणि शिवसेनेमधील युतीची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement