अनेक दशकांच्या दुराव्यानंतर शिवसेना-समाजवादी पुन्हा एकत्र, रविवारी मुंबईत बैठक
Maharashtra Politics : येत्या रविवारी 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील समाजवादी जनता परिवारातील सर्व पक्ष आणि संघटना यांच्यासोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.
Maharashtra Politics : अनेक दशकांच्या दुराव्यानंतर पुन्हा शिवसेना (Shiv Sena : Uddhav Balasaheb Thackeray) -समाजवादी (Samajwadi Party) एकत्र येणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समाजवादी जनता परिवाराशी संवाद साधणार असून रविवारी मुंबईतील (Mumbai News) एम.आय.जी. क्लबमध्ये बैठक घेतली जाणार आहे. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर पक्षात दोन गट पडले एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट (Thackeray Group). त्यानंतर दोन्ही गट आपली बाजू बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात. अशातच ठाकरेंनी आता शिवसेनेला पुन्हा बळकट करण्यासाठी गेली अनेक दशकं समाजवादी आणि धर्मनिरपेक्षवादी विचारांच्या पक्षांपासून राखलेलं आता संपवणार आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एका समाजवादी पक्ष आणि संघटनांसोबत राजकीय वाटचाल करताना दिसणार आहे.
येत्या रविवारी 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील समाजवादी जनता परिवारातील सर्व पक्ष आणि संघटना यांच्यासोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. तसेच, या बैठकीत समाजवादी-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. इंडिया आघाडीत समाजवादी विचारांचे पक्ष आणि ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र आहेतच. आता महाराष्ट्रातही भविष्यात एकत्र राहून निवडणुका लढण्यावर आता दोन्ही पक्षांमध्ये जवळपास एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
रविवारच्या समाजवादी परिवाराच्या बैठकीस निवडक दीडशे जणांना निमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस कपिल पाटील, ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांचा समावेश आहे. कामगार नेते शशांक राव, असीम राव, जार्ज फर्नांडिस यांचे सहकारी सुभाष मळगी, जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष निहाल अहमद यांच्या कन्या शान-ए- हिंद यांची विशेष उपस्थिती या बैठकीत असेल, अशी माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra Politics: पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झाप झाप झापलं!