Sanjay Raut : कितीही एकत्र दिसले तरी अजित पवार गटाला शरद पवार माती चारणारच, संजय राऊतांचं भाकीत; सुषमा अंधारेंचं कौतुक
Sanjay Raut on Ajit Pawar and Sharad Pawar : कितीही एकत्र दिसले तरी शरद पवार अजित पवार गटाला माती चारणार, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
Sanjay Raut News : शरद पवार (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) गटाला माती चारणार, असंं भाकित संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, ''मी शरद पवार साहेबांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार कितीही एकत्र दिसले तरी 2024 च्या निवडणुकीत शरद पवार त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोनच नेते राहतील, जसे त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोनच नेत्यांचे राजकारण होतं. आज शरद पवार पुन्हा एकदा संकटातून उभे राहत आहेत आणि नेतृत्व करत आहेत बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत.'' उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोनच नेते महाराष्ट्रात पुढे यशस्वी झालेले दिसतील, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.
राजकारणामध्ये निष्ठेला महत्त्व
राजकारणामध्ये जीवनामध्ये निष्ठा नसेल श्रद्धा नसेल तर त्याच्या जगण्याला काय अर्थ असेल असे मला वाटत नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्राला मराठी माणसाला सामान्यांना स्वातंत्र्य राहण्याचा मंत्र दिला त्या पक्षाशी निष्ठा ठेवणे हे महाराष्ट्रावर निष्ठा ठेवण्यासारखी आहे असा मी मांडतो त्यामुळे सत्ता येते सत्ता जाते पण संकट आलं म्हणून बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना महाराष्ट्र यांच्याशी बेईमानी करणाऱ्यांना स्थान नाही', असंही राऊतांनी म्हटलं आहे. आज संजय राऊत यांचा वाढदिवस असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राऊतांनी सुषमा अंधारेंचं कौतुक केलं आहे. अंधारे यांनी राऊतांना पत्र लिहून वाढदिवस आणि भाऊबीजेच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
2024 मध्ये महाराष्ट्रात आणि दिल्लीत शिवसेनेची सत्ता
संजय राऊत यांनी पुढे सांगितलं की, ''निष्ठा हा आमचा प्राण आहे. त्यामुळे मी सुषमाताई अंधारे यांचा आभारी आहे. या महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंत शिवसैनिक या बळावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना 2024 मध्ये महाराष्ट्रात आणि दिल्लीत सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही. खरे निष्ठावंत आहेत ते घाबरून पळून जात नसतात. संकटाला खरे निष्ठावंत स्वतःसाठी जगत नाहीत. खरे निष्ठावंत बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेवर विश्वास ठेवतात. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना निर्माण केली, ती शिवसेना त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी व्यक्तिगत स्वार्थासाठी निर्माण केली नाही. कुणी म्हणत असतील की, आम्हीच खरे निष्ठावंत तर तो मूर्खपणा आहे.''
गेल्या वर्षीचा काळ खडतर
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. गेल्या वर्षीचा काळ खडतर होता, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. 'गेल्या वर्षीची दिवाळी तुरुंगात गेली. वाढदिवसाच्या एक-दोन दिवस आधी सुटलो, काळ खडतर आहे. दिवस हे बदलत असतात. काळ खडतर आला म्हणून गुडघे टेकन रडत बसणं, हे आमच्या रक्तात नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितला आहे, तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे खडतर काळ असतो, तो आपल्याला टोचत नाही काही लोक घडतं काळ आला की, पळून जातात अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरच्या लोकांबरोबर तुम्ही पाहिलं असेल. आम्ही सदैव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.'' संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.
देशाचं राजकीय चित्र बदलेलं
नाना पटोले यांनी जरी ही माहिती दिली असेल पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हे अपेक्षेप्रमाणे जर आम्हाला वाटतं तसा काँग्रेसचा विजय होईल त्यानंतर या राज्याचं आणि देशाचं राजकीय चित्र बदलून जाईल 2024 चा निकाल या पाच राज्यांच्या निवडणुकांनी लागणार आहे.
मोदी राहुल गांधींना घाबरतात
राहुल गांधी काय आहेत आणि भविष्यात ते कोठे जाणार आहेत, याचे चित्र स्पष्ट आहे. आजही नरेंद्र मोदी सारखा 56 इंच छातीचा नेता राहुल गांधींना घाबरतो राहुल गांधींवर सातत्याने बोलतो त्यांच्यावर चर्चा करतो हेच राहुल गांधी यांचा यश आहे राहुल गांधी मूर्खाचे सरदार आहेत तर बोलता कशाला त्यांना मिळणाऱ्या पाठिंबाविषयी भय आहे .म्हणून तुम्हाला जयश्री राहुल गांधी दिसतात .ही चांगली गोष्ट आहे तुम्ही काँग्रेस मुक्त करू शकला नाहीत .काँग्रेस तुमच्या बोकांडी बसली आहे. शिवसेना तुम्ही संपविले नाही. उलट शिवसेना जोमाने उभे राहिली. त्याही पक्षाला मुक्त करून या देशांमध्ये लोकशाही टिकणार नाही. या मताचे आम्ही आहोत उद्या सत्तेवर आलो तर आम्ही अस म्हणणार नाही .भाजप मुक्त देश आम्हाला करायचा आहे आम्ही त्यांना आरसा दाखवनार..