एक्स्प्लोर

आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत, आमच्या भेटीनंतर 'सामना'ने पुन्हा अग्रलेख लिहावा : बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याचं म्हटलं जात आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यातच या नाराजीवरुन सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला चिमटे काढण्यात आले. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई : "आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्याकडे मांडू. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. त्यानंतर सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय," असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट आणि 'सामना'तील अग्रलेखावर भाष्य केलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, "कोणत्या बदल्यांसाठी आम्ही आग्रही नाहीत. तर महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत ही अपेक्षा आमची आहे. त्यासाठी आम्ही बैठक मागत आहोत. खाटेचं कुरकुरणं आधी ऐकून तर घ्यावं. ते ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. आज-उद्या मुख्यमंत्री भेटतील. आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही म्हणणं मांडल्यानंतर 'सामना'ने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे चुकीचा संदेश आमच्याबद्दल जातोय आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहोत, आघाडीबरोबर राहणार आहोत. त्यामुळे आम्हाला चर्चा करायची आहे आणि राज्याचे प्रमुख, आघाडीचे प्रमुख या नात्याने त्यांनी ऐकून घ्यायला हवं. मला खात्री आहे की आमचं म्हणणं ऐकल्यानंतर ते समाधानी होतील."

56, 54, 44 नुसार मंत्रिमंडळाचं वाटप "56, 54 आणि 44 प्रमाणे आम्ही मंत्रिमंडळाचं वाटप केलेलं आहे. त्यानुसारच आम्हाला मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे. हा काही वादाचा विषय नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय आम्हाला अपेक्षित आहेत. त्यासाठी आम्हाला भेट घ्यायचे आहेत," असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

अपूर्ण माहितीवर 'सामना'चा अग्रलेख 'सामना'च्या अग्रलेखाविषयी बाळासाहेब थोरात म्हणाले की, "अपूर्ण माहितीवर हा अग्रलेख लिहिला आहे. त्यामुळे तसं होऊ शकेल. आमची भेट झाल्यावर त्यांनाही वस्तुस्थिती समजेल. पुन्हा एक चांगला अग्रलेख येईल. 'सामना' शिवसेनेचं मुखपत्र आहे. त्यामुळे अपेक्षित एवढंच आहे की व्यवस्थित माहिती घेऊन त्यात लिखाण असावं."

'सामना'च्या अग्रलेखातून काँग्रेसला चिमटे "सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरेंच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहिल हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. शरद पवारांनी हे पथ्य पाळलंय. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे.

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाल लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, इतकेच शेवटी सांगायचे."

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; CBIच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
'नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Embed widget