Ro-Ro Ship | रो रो सेवेला सुरूवात
रो पॅक्स सेवेमुळे मुंबईकरांना खूप फायदा होणार असे सांगितले जात आहे. जी बोट आणली आहे त्यात देखील अनेक सुविधा आहेत. मात्र त्यासाठी तिकीट देखील चांगलेच आकारले जाणार आहे.
मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा पर्यंत रो पॅक्स या नवीन सेवेचे आरंभ करण्यात आलेला आहे. एकावेळी 500 प्रवासी आणि 145 गाड्या या या बोटीतून प्रवास करू शकतील. ही बोट खास ग्रीस करून बनवण्यात आलेली आहे. त्यानंतर समुद्रमार्गे ती मुंबईला आली. मुंबईत आणल्यानंतर मुंबई ते मांडवा या मार्गावर तिच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि संपूर्ण सुरक्षीत असल्यानंतर ही बोट आता सेवेसाठी दाखल झाली आहे. या बोटीला आय आर एस संस्थेचे सुरक्षिततेचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. मुंबई मेरी टाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने ही सेवा सुरू केली असून एका प्रायव्हेट कंपनीला हे कंत्राट मिळाले आहे. एम 2 एम वन असे या सेवेला नाव देण्यात आले आहे.
रो पॅक्स सेवेमुळे मुंबईकरांना खूप फायदा होणार असे सांगितले जात आहे. जी बोट आणली आहे त्यात देखील अनेक सुविधा आहेत. मात्र त्यासाठी तिकीट देखील चांगलेच आकारले जाणार आहे.
रो पॅक्स सर्व्हिस तिकीट -
प्रवाशांसाठी
ओपन डेक प्रवासी - 225 एसी लॉज- 335, लक्झरी एसी लॉज- 555
गाड्यांसाठी
छोट्या गाडी - 800 मिडीयम गाडी -1200 मोठी गाडी- 1600
Mumbai to Alibaug Ro-Ro ferry | रो रो सेवेतील पहिली बोट आज रवाना होणार
मुंबई ते मांडवा जाण्यासाठी सध्या 2 पर्याय आहेत. रस्तेमार्ग आणि भाऊचा धक्का येथून छोट्या फेरी बोट मात्र दोन्ही पर्यायात काही त्रुटी आहेत. एक म्हणजे रस्ते मार्गाने जाताना मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होतो. पेट्रोल, डिझेलवरील पैसे खर्च होतात, त्यामुळे मानसिक शारीरिक त्रास होतो. छोट्या फेरी बोटीतून जाताना आपली गाडी आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. सुरक्षेचा प्रश्न देखील आहे. रो पॅक्स सर्व्हिसमध्ये या दोन्ही कमतरता भरून निघणार आहेत. या बोटीतून एकाचवेळी प्रवासी आणि गाड्या दोन्ही प्रवास करू शकतील. मुंबई ते मांडवा रस्ते मार्गाने जाण्यासाठी लागणारा चार तासांचा वेळ वाचणार आहे. कारण ही बोट 45 मिनिटात मांडवा जेट्टीला पोहचेल. रस्त्यावरील ट्रॅफिक बऱ्याच अंशी कमी होईल, सोबत पेट्रोल डिझेलवरील खर्च वाचेल. त्यामुळे प्रदूषण देखील कमी होण्यास देखील मदत होणार आहे.
ग्रीस देशातून ही बोट बनवून आणली आहे. येताना खुल्या समुद्रातून चालवत आणल्याने अनेक गोष्टींच्या चाचण्या तेव्हाच झाल्या. त्यात ही बोट अतिशय सुरक्षित असल्याचा दावा केला गेलाय. या बोटीला आय आर एस संस्थेचे प्रमाणपत्र देखील प्राप्त झाल आहे. मुंबई ते मांडवा जाणाऱ्या छोट्या फेरी बोट या पावसाळ्यात बंद केल्या जातात. आज सुरू झालेली रो पॅक्स सेवा तिन्ही ऋतुंमध्ये सुरू राहणार आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
संबंधित बातम्या :