एक्स्प्लोर
मुंबईकरांसाठी खुशखबर, मुंबई-अलिबाग प्रवास सुसाट
मुंबई शहरात दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या वाढत असून या समस्येपासून सुटका करण्या साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. त्यातून अधिक डोकेदुखी म्हणजे ट्राफिक वेळ आणि प्रदूषण या समस्याना प्रवाशांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे मांडवा अलिबाग परिसरात जाण्यासाठी मुंबईत रो-रो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते.

मुंबई : मुंबई आणि अलिबाग परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी आता एक खुश खबर आहे. मुंबई - मांडवा रो-रो सेवेला मार्चच्या पहिल्या आठवड्या पासून सुरुवात होणार आहे. हा प्रवास घडवणारं पहिलं रो-रो जहाज 13 फेब्रुवारीला मुंबईच्या बंदरात दाखल होणार आहे. मुंबई शहरात दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या वाढत असून या समस्येपासून सुटका करण्या साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. आता मुंबईतून अलिबाग मांडवा याठिकाणी जायचं असेल तर तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतो. त्यातून अधिक डोकेदुखी म्हणजे ट्राफिक. वेळ आणि प्रदूषण या समस्याना प्रवाशांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे मांडवा अलिबाग परिसरात जाण्यासाठी मुंबईत रो-रो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. आता ही सेवा लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. मुंबई आणि मांडवा दरम्यान हे जहाज धावणार असून त्यामुळं मुंबई-अलिबाग हे अंतर चार तासांवरून एका तासावर येणार आहे. रो-रो सेवेमुळं रस्त्यावरील वाहतूक कोंडी टळणार असून इंधन बचतीमुळं प्रदूषणाचं प्रमाणही कमी होणार आहे. ग्रीसमधील 'एस्कॉयर शिपिंग' कंपनीनं या जहाजाची बांधणी केली आहे. हे जहाज भारतात आले असून 13 तारखेला ते मुंबईत दाखल होणार आहे. दरवर्षी अंदाजे 20 लाख लोक मुंबई गेट-वेहून मांडव्याला ये-जा करतात. त्यातील काही छोट्या बोटीचा आधार घेतात. तर काही रस्ते मार्गे कार किंवा बसनं जातात. रो रो ची सेवा सुरू झाल्यानंतर या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रोरो म्हणजे रोल ऑन रोल ऑफ - म्हणजेच प्रवाशांची ये-जा करणारी सेवा
- रो-रो जहाज एकावेळी 500 प्रवासी प्रवास करणार
- 180 कारची वाहतूक करू शकते.
- सुरुवातीला दर तीन तासांनी जहाजाच्या फेऱ्या होणार .
- कारच्या वाहतुकीसाठी एका बाजूचं भाडं एक ते दीड हजार असेल.
- प्रवाशांसाठी हेच भाडं प्रत्येकी 235 रुपये असेल.
आणखी वाचा























