एक्स्प्लोर

Mumbai Slum Development:  राज्य सरकारचा मोठा निर्णय! झोपडपट्टीवासियांना मिळणार अडीच लाखात घर

Mumbai Slum Development: एक जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील मुंबईतील झोपडीधारकांना अवघ्या अडीच लाखात घरं मिळणार आहेत.

Mumbai Slum Development:  राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एक जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना फायदा होणार आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या दोन लाख 50 हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.  त्याशिवाय या निर्णयामुळे झोपडपट्टी असलेल्या जागांचा विकास होणार आहे. 

अटी काय?

राज्य जारी केलेल्या निर्णयानुसार, या नव्या योजनेतील लाभार्थी झोपडपट्टीवासियांच्या अटी आणि शर्थी निश्चित करण्यासाठीची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गेमचेंजर?

आगामी काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणूक लक्षात घेता, राज्य सरकारकडून सातत्याने मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महत्त्वाच्या महापालिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. 

मुंबईतील 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या कालावधीतील झोपडपट्टीधारकांना आता अडीच लाखात घरं देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.या निर्णयाचा फायदा लाखो झोपडपट्टीवासियांना होणार आहे. मुंबईत अडीच लाखात हक्काचे घरं देण्याचा निर्णय मोठा गेमचेंजर ठरू शकतो.  

इतर संबंधित बातमी:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget