एक्स्प्लोर

मनसे भाजपसोबत जाणार? राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रभादेवी परिसरातील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये ही बैठक झाल्याचे कळतंय. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज मुंबईत घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत जाण्याची शक्यता असल्याची बातमी एबीपी माझाने अगोदरच दिली आहे. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं असल्याची चर्चा आहे. कारण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रभादेवी परिसरातील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये ही बैठक झाल्याचे कळतंय. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीबद्दल मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिवेशन आहे. तत्पूर्वी फडणवीसांसोबत झालेली राज यांची भेट मनसेसोबतच राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरु शकते, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक दिवस विविध घडामेडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचं नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडण्याची शक्यता आहे. कारण झेंडा भगवा करुन हिंदुत्ववादाची कास धरण्याचा प्रयत्न करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजपसोबत जाऊ शकते, असं खळबळजनक विधान मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. काल (07 जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भविष्यात कोणत्याही पक्षासोबत राजकीय समीकरणे जुळू शकतात, असं विधान केलं होतं. नांदगावकरांच्या या विधानानंतर मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार की काय? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. त्यातच आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीनंतर या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे बोले जात आहे.

भारतीय जनता पक्षाचा गेल्या दोन दशकांपासूनचा मित्रपक्ष असलेली शिवसेना धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत गेलेली असल्याने हिंदुत्ववादी पोकळी भरुन काढण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच मनसे आता हिंदुत्वाचा विचार करत भगवा रंग धारण करणार आहे. मोदी-शाहांना राजकीय क्षितीजावर दिसून देऊ नका, असं म्हणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचीच साथ घेणार का, असा सवालही उपस्थित होतोय. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजपसोबतही जाऊ शकते असं विधान मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात मनसेचा झेंडा बदलणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

मनसे हा पक्ष स्थापन होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. परंतु या 14 वर्षांमध्ये मनसेच्या वाट्याला यशापेक्षा अपयशाचे झेंडेच हाती घ्यावे लागले आहेत. 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेनं 13 आमदार निवडून आणले. नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई महापालिकांमध्येही मनसेला मोठं यश मिळालं. नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. परंतु त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांचे दारुण पराभव झाले.

2014 नंतर पक्ष अजूनच अपयशी ठरु लागला. 2014 साली तर राज ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत मनसेला केवळ एकच आमदार निवडून आणता आला. मुंबई महापालिकेमध्ये तर राज ठाकरे यांच्या पक्षाचा केवळ एकच नगरसेवक आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेचा केवळ एक नगरसेवक शिल्लक आहे. 2012 मध्ये मुंबई महापालिकेत मनसेचे 28 नगरसेवक होते.

पाच वर्ष मनसेची नाशिकमध्ये सत्ता होती. (2012 मध्ये नाशिकमध्ये मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले होते.) परंतु नाशिक महापालिकाही मनसेच्या हातून निसटली. (2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले.)

सततच्या अपयशामुळे मनसेच्या विचारधारेमध्ये फोकस नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कधी मराठी माणसांसाठी, कधी हिंदूंसाठी, तर कधी सर्वांसाठीच मनसे धावून गेली. परंतु कोणताही एक समाज मनसेचा होऊ शकला नाही. त्यामुळे राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याचे बोलले जात आहे.

मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये पक्षाची सर्वसमावेशकता दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ही आघाडीच्या वळचणीला गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत का? हे 23 तारखेलाच कळेल, कारण 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी मनसे त्यांच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार असल्याचे बोलले जात आहे.

व्हिडीओ पाहा

Nitin Sardesai | मनसे कात टाकणार, बदल नक्की होणार : नितीन सरदेसाई | ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget