Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
Rohit Arya Encounter: पवई पोलिसांच्या शौर्यपूर्ण आणि तत्पर हालचालीमुळे 17 लहान मुलांसह 19 जणांचे जीव वाचले. घटनेची माहिती दुपारी पावणे दोनच्या सुमारास पवई पोलिसांना मिळाली होती.

Rohit Arya Encounter: मुंबईमधील पवईतील (Mumbai Hostage News) आर.के. स्टुडिओ परिसरात घडलेला थरार सिनेमातील प्रसंगालाही मागे टाकणारा ठरला. वेब सिरीजच्या नावाखाली लहान मुलांना स्टुडिओत बोलावून ओलीस ठेवणारा रोहित आर्या पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाला. रोहितने पोलिसांच्या दिशेनं फायरिंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारे यांनी लहानग्यांचा जीव वाचवण्यासाठी गोळी झाडली. यावेळी त्यांनी क्राॅस फायरिंग करत डाव्या बाजूला छातीत गोळी झाडली. पवई पोलिसांच्या शौर्यपूर्ण आणि तत्पर हालचालीमुळे 17 लहान मुलांसह 19 जणांचे जीव वाचले. घटनेची माहिती दुपारी पावणे दोनच्या सुमारास पवई पोलिसांना मिळाली. “आर.के. स्टुडिओ मुलांना ओलीस ठेवले आहे,” अशी धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. आरोपीकडे एअर गन असल्याचं समजलं, तसेच त्याने कोणताही आत प्रवेश करू नये म्हणून स्टुडिओच्या सर्व खिडक्यांवर सेन्सर बसवले होते. संपूर्ण परिसराला थरकाप उडवणाऱ्या या घटनाक्रमानं तणावाचं वातावरण निर्माण झालं.
बाथरूममार्गे आत प्रवेश करून मुलांना वाचवण्याची धाडसी योजना
पोलिसांनी (Hostage in Mumbai) घटनास्थळी धाव घेताच रोहितशी संवाद साधत त्याला संभाषणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका पथकाने बाथरूमच्या मार्गे आत प्रवेश करून मुलांना वाचवण्याची धाडसी योजना आखली. मात्र, रोहितने मुलांच्या डोक्याला बंदूक लावण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर फायर करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. यावेळी पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारे यांनी झाडलेली गोळी रोहितच्या डाव्या बाजूस लागली. तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला ट्रॉमा सेंटरला हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कारवाईनंतर पोलिसांनी स्टुडिओ आणि त्यातील स्कूल बसमधून सर्व ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली. या घटनेत 17 लहान मुलांसह एकूण 19 जणांची सुटका करण्यात आली. एक ज्येष्ठ महिला आणि एका लहान मुलगी कारवाईत जखमी झाली आहे.
जीवितहानीचा प्रसंग टळला (RA Studio Powai)
मुंबई पोलिसांच्या धाडसी आणि योजनाबद्ध हालचालीमुळे एक मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला. पवई पोलिसांनी दाखवलेली उपस्थिती, संयम आणि वेगवान प्रतिसाद ही महानगरातील पोलिस यंत्रणेची सजगता आणि प्रशिक्षण यांचे उत्तम उदाहरण ठरली. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.आरोपी रोहित आर्या नेमका कोण आणि कोणत्या उद्देशाने हा घातक प्रयोग करत होता, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
रोहित आर्या नेमकी काय मागणी करत होता? (Who Is Rohan Arya)
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने राबवलेली स्वच्छता मॉनिटर संकल्पना गुंडाळल्यानंतर ज्याची संकल्पना होती. कंत्राट घेतलेल्या रोहित आर्याचे 45 लाख शालेय शिक्षण विभागाने बुडवल्याचा आरोप आहे. स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर असताना राबवण्यात आली. यामध्ये समाजात होणाऱ्या गैरप्रकारावर विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावं, अशा प्रकारची सवय या संकल्पनेतून लागावी यासाठी हे अभियान राबवण्यात आले. एक वर्ष अभियान सुरु राहिलं. मात्र, नंतर हे अभियान गुंडाळण्यात आले. मात्र, यासाठी दोन कोटीचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आणि त्यातील 45 लाख रुपये अजूनही शालेय शिक्षण विभागाने दिलेले नाहीत. त्यामुळे मे महिन्यात रोहित आर्या आझाद मैदानावर आंदोलनाला सुद्धा बसला. त्यानंतर त्याने शिक्षण विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची मंत्र्यांची भेट घेतली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. मागील काही दिवसांपासून रोहित हा मानसिक तणावात होता आणि ट्रीटमेंट सुद्धा घेत असल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















