एक्स्प्लोर

Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी

Mumbai Powai Encounter: या घटनेमध्ये एक लहान मुलगी आणि एक वृद्ध महिला सुद्धा जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 

Mumbai Powai Encounter: वेब सिरीजमध्ये कास्टिंग करण्याच्या नावाखाली तब्बल 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या  किडनॅपरचा एन्काऊंटर करण्यात आला. पवई पोलिसांकडून 17 मुलांसह 19 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीमध्ये रोहित आर्या गंभीर जखमी झाला होता. यावेळी रोहित आर्याने पोलिसांवरती फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या क्रॉस फायरिंगमध्ये छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. लहान मुलांची सुखरुप सुटका केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमध्ये एक लहान मुलगी आणि एक वृद्ध महिला सुद्धा जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 

आरोपी रोहितला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने बाथरुममधून प्रवेश

आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास पवई पोलीस स्टेशनमध्ये मुलांना ओलिस ठेवल्याची माहिती दिली पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एका बाजूने आरोपी रोहितला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने बाथरुममधून प्रवेश करत मुलांची सुटका केली. पोलिसांनी तासाभरात 19 जणांची सूटका केली. घटनास्थळावरून एअर गन आणि रसायने जप्त करण्यात आली होती. तथापि, आरोपी रोहित आर्यचा हेतू अद्याप अज्ञात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने 100 हून अधिक मुलांना ऑडिशन्ससाठी बोलावले होते. रा स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग सुरू आहेत, जिथे मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. घटनेदरम्यान, मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. त्यांचे पालकही आले होते. मुलं लंचसाठी बाहेर न आल्याने शंका बळावली आणि पालकांची घालमेल सुरु झाली.

आरोपी रोहित म्हणाला, 'मला फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत'

रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आला होता, ज्यामध्ये तो म्हणत होता की, "मी रोहित आर्य आहे. आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली आहे आणि इथं काही मुलांना ओलीस ठेवत आहे. माझ्या फारशा मागण्या नाहीत. माझ्या खूप साध्या मागण्या आहेत, नैतिक मागण्या आहेत आणि काही प्रश्न आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि जर त्यांच्या उत्तरांच्या उत्तरात मला काही प्रश्न असतील तर मी त्यांनाही विचारू इच्छितो, पण मला ही उत्तरे हवी आहेत." "मला दुसरे काहीही नको आहे. मी दहशतवादी नाही, किंवा मी खूप पैसे मागत नाही आणि मी कोणतीही अनैतिक मागणी करत नाही. मी योजनेचा भाग म्हणून मुलांना ओलीस ठेवले आहे. जर मला थोडीशीही चिथावणी दिली गेली तर मी या जागेला (स्टुडिओला) आग लावीन. आत्महत्या करण्याऐवजी मी ही योजना आखली आहे. मला चिथावू नका, नाहीतर मी मुलांना हानी पोहोचवणारी पावले उचलेन."

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget