एक्स्प्लोर
Advertisement
शालेय विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती कोचिंग क्लासकडे, डाटा लीकविरोधात पालक आक्रमक
आपल्या पाल्याची सर्व वैयक्तिक माहिती कोचिंग क्लास चालकांना माहित होत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईतील अनेक पालक करत आहेत. मात्र ही माहिती कुठून मिळाली, याविषयी समजत नसल्याने पालक संभ्रमात आहेत
मुंबई : शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनो, जरा सावधान ! तुमची वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना काही दिवसांपासून विविध कोचिंग क्लासेस कॉल करुन आपल्याकडे प्रवेश घेण्याची विनंती करत आहेत. विद्यार्थ्यांची प्रत्येक वैयक्तिक माहिती या कोचिंग क्लासेसकडे असल्याचं समोर येत आहे.
कायद्याचं उल्लंघन करुन विद्यार्थ्यांचा वैयक्तिक डेटा लीक होत असल्याचं पालक आणि पालक संघटनांनी समोर आणलं आहे. अनेक नामांकित शाळा वैयक्तिक माहिती या कोचिंग क्लासेसला पुरवत असल्याचा आरोप केला जात आहे.
आपल्या पाल्याची सर्व वैयक्तिक माहिती कोचिंग क्लास चालकांना माहित होत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईतील अनेक पालक करत आहेत. कोचिंग क्लासेसकडे ही माहिती कुठून आली, याबाबत विचारणा केली, तरी त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
अनेक नामांकित शाळांनी आपलं अॅप तयार केलं असून त्यात विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती भरुन घेतली जाते. त्यामुळे हा डेटा कोचिंग क्लासेसच्या हाती तर लागत नाही ना ? याबाबत पालकामध्ये संभ्रम आहे. शाळासुद्धा याबाबत नकार देत असल्यामुळे हा डेटा लीक कसा झाला? याबाबत पालकांनी आता आवाज उठवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशनुसार विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक किंवा आधारकार्ड वरील माहिती कुठेही लीक होऊ देता येत नाहीत. तरीही हा प्रकार घडत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे याबाबत आज तक्रार करणार असून लवकरात लवकर हा डेटा कसा लीक होत आहे याची माहिती शासनाने लक्ष घालून द्यावी, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement