एक्स्प्लोर
Advertisement
मॅट्रिमोनी साईटवरुन फसवणूक, भामटा नवरदेव अटकेत
मंगेश एका नामांकित मॅट्रिमोनी साईटवरुन महिलांशी ओळख करून घ्यायचा. महेश कुलकर्णी या नावाने प्रोफाईल बनवून स्वत:ला हॉटेल व्यावसायिक सांगून आणि गोड बोलून आणि लग्नाचे अमिष दाखवून मंगेशने लाखो रुपये लुबाडले.
मुंबई : मॅट्रिमोनी साईटवरुन लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका भामट्या नवरदेवाला मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. मंगेश लाड असे या भामट्या नवरदेवाचे नाव आहे. मंगेशने एका नामांकित मॅट्रिमोनी साईटवरुन लग्नाचे अमिष दाखवून 8 महिलांची फसवणूक करत लाखो रुपये लुटले आहेत.
मंगेश एका नामांकित मॅट्रिमोनी साईटवरुन महिलांशी ओळख करून घ्यायचा. महेश कुलकर्णी या नावाने प्रोफाईल बनवून स्वत:ला हॉटेल व्यावसायिक सांगून आणि गोड बोलून आणि लग्नाचे अमिष दाखवून मंगेशने लाखो रुपये लुबाडले. त्याने आतापर्यंत 8 महिलांकडून 14 लाख 20 हजार रुपये लुटले आहेत. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका मुलीला जेव्हा त्याचा संशय आला, तेव्हा तिने एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अटक केले आहे.
आरोपी मंगेश लाडने स्वत:च्या त्याच्या घरच्या लोकांना सुद्धा आर्थिक व्यवहारात फसवलं आहे. तो वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहायचा. ज्या महिलांना त्याने फसवले त्यांचे नंबर त्याने आई, बहीण यांच्या नावाने सेव्ह केले होते. पोलिसांनी जेव्हा त्या नंबरवर फोन केले तेव्हा ही बाब समोर आली.
पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टाने मंगेश लाडला 17 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement