एक्स्प्लोर

'अय्यारी'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, सेन्सॉरची मंजुरी

सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला अय्यारी सिनेमाचं कथानक लष्करातील भ्रष्टाचारावर आधारित आहे.

मुंबई : दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या अय्यारी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं आहे. या सिनेमात संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेत काही बदल सुचवले होते. मात्र निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा सिनेमा 16 फेब्रुवारीला रिलीज होईल. सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला अय्यारी सिनेमाचं कथानक लष्करातील भ्रष्टाचारावर आधारित आहे. आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतली होती. शनिवारी संरक्षण मंत्रालयासाठी 'अय्यारी' सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्रालयातील काही अधिकारीही या शोला उपस्थित होते. मात्र सिनेमा पाहून त्यांनी या हिरवा कंदील दिलेला नव्हता. सिनेमात काही बदल करण्यास निर्मात्यांना सुचवण्यात आलं होतं. सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते बदलण्यास सांगण्यात आले होते. अर्थात ती दृश्य काय आहेत, याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. अय्यारी हा सिनेमा सुरुवातीला 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी पद्मावत आणि पॅडमॅन यांसारखे दोन तगडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आल्याने अय्यारीने आपली रिलीजिंग डेट 9 फेब्रुवारीला हलवली. मात्र आता ही तारीख पुढे ढकलत 16 फेब्रुवारी करण्यात आली आहे. ‘अय्यारी’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. तर अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, राकुल प्रीत सिंह, कुमुद मिश्रा, पूजा चोप्रा, आदिल हुसैन आणि विक्रम गोखले यांच्यासारखे कसलेले कलाकार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Embed widget