एक्स्प्लोर
मुंबईत धान्याने भरलेला ट्रक पलटी, चौघांचा मृत्यू तर एक गंभीर
गटाराचे काम एका आठवड्यापूर्वीच झाले होते आणि हे काम अगदी निकृष्ट दर्जाचे झाले होते. ज्यामुळे हे झाकण मोडले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यात पूर्णपणे काँट्रॅक्टर दोषी आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईटमध्ये धान्याने भरलेला एक ट्रक पलटी झाल्याने त्या ट्रकखाली दबून चौघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर झाला आहे. गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
विक्रोळी पार्कसाईटमध्ये धान्याने भरलेला ट्रक जात असताना ट्रकचा मागील चाक गटाराचं झाकण तोडत गटाराच्या आत गेल्यामुळं ट्रक पलटी झाला. यावेळी तिथे खाली पाचजण जेवण करून बाहेर उभे होते. ते सर्वजण त्या ट्रकच्या खाली आले. हा ट्रक धान्याने भरलेला असल्यामुळे या दबल्या गेलेल्या लोकांना वाचविण्यासाठी काही मदत करता येत नव्हती. या नंतर लोकांनी ट्रकमधील धान्य काढलं.
माहिती कळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत नागरिकांच्या मदतीने ट्रक उचलला. मात्र तोपर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेत एकजण जखमी झाला आहे. जखमीला राजावाडीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
या गटाराचे काम एका आठवड्यापूर्वीच झाले होते आणि हे काम अगदी निकृष्ट दर्जाचे झाले होते. ज्यामुळे हे झाकण मोडले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यात पूर्णपणे काँट्रॅक्टर दोषी आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिकांनी या गटाराची तक्रार याआधीही केली होती. ज्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
