एक्स्प्लोर
Advertisement
बदनामी करुन मुंबई जिंकता येणार नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबई शहराची बदनामी करुन त्याच शहरात राहायचं. बदनामी करुन मुंबई जिंकता येणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. मुंबईतील वरळीतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेने मुंबईत केलेल्या कामांचा दाखला देत, भाजपवर हल्लाबोल केला.
मग कामं समजून घ्या, मग बोला
मुंबईतील कामांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महापालिकेची कामं काय असतात हे पाहिलं समजून घ्या आणि मग बोला. मुंबई महापलिकेचं केंद्राकडून कौतुक होतं, मग केंद्रात की राज्यात गाढव बसले आहेत का खोटा रिपोर्ट द्यायला?
2005 सारखी मुंबई तुंबणार नाही
थापा मारुन आम्ही मते मागितली नाहीत आणि मागणार नाही. मुंबई 2005 सारखी पुन्हा तुंबणार नाही हे शिवसेनेचं वचन आहे. मुंबई महापालिका आपण जिंकणार आहोतच त्याच्याबद्दल काही शंका नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील राजकारणाची दिशा बदलेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा अपमान केला
मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना कायम आश्वासनं दिली. पण मुंबईचा 'पाटणा' उल्लेख करुन त्यांनी पोलिसांचा अपमान केला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवरायांचा फोटो लावायचा नाही
भाजपमधील गुंडांच्या इनकमिंगवर बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. "मुंबईत शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीचा आशीर्वाद. तुमच्या पोस्टरवर दाऊदचा, पप्पू कलानीचा, नरेंद्र मोदींचा किंवा अमित शहांचा फोटो लावा, पण शिवरायांचा लावायचा नाही. ज्यांनी शिवरायांचा ध्वज कापला त्यांना शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्याचा अधिकार नाही," असं म्हणत उद्धव ठाकरे भाजपवर बरसले.
भाषणातील मुद्दे
तुम्ही आता तीर्थप्रसाद घ्यायला फिरत आहात पण वेळप्रसंगी रक्तदान करायला शिवसैनिकच पुढे असतो
मुंबईत शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीचा आशीर्वाद - उद्धव ठाकरे
नोटाबंदी लादणारे तुम्ही, पण नोटाबंदीमुळे बँकेच्या लाईनमध्ये त्रस्त झालेल्यांना पाणी देणारे आम्ही
शिवसेनेचा जन्म अन्यायावर वार करण्यासाठी झाला आहे, अन्याय सहन करण्यासाठी नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement