एक्स्प्लोर

Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल अद्याप रेंगाळलेलाच आहे.

Mumbai Sakinaka Manhole: चेंबूरमधील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरून सध्या मुंबई महानगरपालिकेत (BMC) जोरदार राजकीय वाद सुरू आहे. हा वाद ताजा असतानाच, दुसरीकडे साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये (Manhole) पडून झालेल्या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल अद्याप रेंगाळलेलाच आहे. पालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, आता 15 दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही हा अहवाल सार्वजनिक न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर आणि एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Mumbai Sakinaka Manhole: नेमकी घटना काय होती?

2 जुलै रोजी कुर्ला-साकीनाका येथील खैरानी मार्गावर मलनिस्सारण विभागाकडून मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान असलम इसाक शेख (55) हे उघड्या मॅनहोलमध्ये कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ते मॅनहोलमध्ये वाहून गेले होते. शोधमोहिमेनंतर घटनास्थळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या निष्काळजीपणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

Mumbai Sakinaka Manhole: आयुक्तांची डेडलाईन हुकली

या भीषण घटनेची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एक स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती आणि त्यांना सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने दिलेली ही मुदत संपून आठवडा उलटला, तरीही अहवाल समोर आलेला नाही.  

Chembur Tree Collapse: चेंबूर प्रकरणावरून पालिकेत आधीच राजकारण तापले

विशेष म्हणजे, साकीनाका दुर्घटनेच्या अवघ्या दोन दिवस आधी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशी अहवालावरून पालिकेत सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे. महापौर रितू तावडे यांनी हा अहवाल फेटाळून लावला आहे, तर सभागृह नेते गणेश खणखर यांनी थेट सभागृहात तो अहवाल फाडून या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे चेंबूर दुर्घटनेवरून पालिकेचे राजकारण तापलेले असताना, साकीनाका दुर्घटनेचा चौकशी अहवाल कधी जाहीर होणार आणि या निष्काळजीपणासाठी जबाबदार असणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, याकडे आता मुंबईकरांचे डोळे लागले आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget