एक्स्प्लोर

Mumba Police : पोलीस शिपाई ते जमादार यांना आठ तास ड्युटी, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

Mumbai Police : पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या आठ तास ड्युटीच्या परिपत्रकावर स्वाक्षरी करत, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. महिलां पोलीस कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनाही आठ तास ड्युटी असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या आठ तास ड्युटीच्या परिपत्रकावर स्वाक्षरी करत, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. आता 50 वर्षांखालील पोलिसांना आठ तास काम आणि 16 तास आराम, तर 50 वर्षांवरील पोलिसांसाठी 12 तास काम आणि 24 तास आराम असा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. 17 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. पोलिसांची कार्यक्षमता वाढावी आणि पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर संजय पांडे यांनी दुसऱ्याच आठवड्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटीची अनोखी भेट दिली होती. आता पोलीस शिपाई आणि आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनाही आठ तास ड्युटी करावी लागणार आहे. 

या आदेशात म्हटलं आहे की, "मुंबई पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांना '8 तास काम आणि 16 तास आराम' ही कर्तव्य पद्धत सुरु केल्यानंतर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये सकारात्मक बदल दिसून आहे. ही कर्तव्य पद्धतीचे फायदे पोलीस अंमलदारांनाही मिळावे असा विचार आला आणि त्यांच्यासाठी '8 तास कर्तव्य 16 तास आराम' अशी ड्युटी सुरु करण्याची विनंती केली. मुंबईतील पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्तव्य समिती स्थापन करण्यात आली. या समितीने शिफारशींसह अहवाल सादर केला. पोलीस स्टेशनमधील ड्युटीच्या वेळापत्रकामुळे बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याकडे तसंच कुटुंबीयांकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं शक्य होत नाही. कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी तसंच पोलीस विभागाच्या सक्षमीकरणाकता काही ठराविक परिस्थिती वगळता आठ तास कर्तव्य आणि 16 तास आराम ही पद्धत योग्य राहिल अशी शिफारस समिती सदस्यांनी केलेली आहे.

समितीने केलेल्या शिफारशी

- मुंबई शहरात राहणाऱ्या तसंच पोलीस ठाण्यापासून जवळ राहणाऱ्या पोलीस अंमलदारांना '8 तास कर्तव्य 16 तास आराम' हे कर्तव्य देण्यात यावं.

- पोलीस स्टेशनपासून 50 किमीपेक्षा दूर अंतरावर राहणाऱ्या पोलीस अंमलदारांना '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम' कर्तव्याचा पर्याय देण्यात यावा.

- ज्या पोलीस अंमलदारांना '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम' हे कर्तव्य देण्यात येणार आहे, त्यांना साप्ताहिक रजा देण्यात येणार नाही

- 55 वर्षांवरील अंमलदार, त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या उदा. उच्च मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या व्याधी/आजारांनी ग्रस्त असलेल्या पोलीस अंमलदारांना त्यांच्या विनंतीप्रमाणे '8 तास कर्तव्य 16 तास आराम' किंवा '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम'कर्तव्ये देण्यात यावे.

- '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम' कर्तव्य देताना अप्पल पोलीस आयुक्त आणि परिमंडळीय पोलीस उपायुक्त यांनी पोलीस ठाण्यातील अशा कर्तव्याची यादी तयार करावी. निश्चित करण्यात आलेल्या कर्तव्याच्या ठिकाणीच फक्त '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम' कर्तव्य देण्यात यावं.

- अप्पर पोलीस आयुक्तांनी '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम' या कर्तव्य पद्धतीसाठी प्राप्त झालेल्या विनंती अर्जांची योग्यरित्या छाननी करावी आणि पात्र पोलीस अंमलदारांचीच विनंती मंजूर करुन त्यांना '12 तास कर्तव्य आणि 24 तास आराम' कर्तव्य देण्यात यावं.

- पोलीस ठाण्यातील कार्यलयीन कामकाज करणारे अमंलदार हे सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत दहा तास कर्तव्य करतील

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्याAmit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Embed widget