Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
Superstar Prabhas Wedding Rumurs: लग्नाचं वय उलटून गेलेल्या प्रभासच्या लग्नाबाबत चाहत्यांना काळजी लागून राहिली आहे. चाहते कधी त्याचं नाव साऊथची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत जोडतात. तर, कधी त्याच्यासोबत चित्रपटात झळकलेल्या कोणत्याही अभिनेत्रीसोबत.
Prabhas Wedding Cryptic Post Goes Viral: जसा बॉलिवूडमध्ये (Bollywood) सलमान खान (Salman Khan) लग्न कधी करणार? हा प्रश्न सर्वांना सतावतोय, अगदी तसाच प्रश्न टॉलिवूडमध्ये (Tollywood) बाहुबली (Bahubali) फेम प्रभासच्या (Prabhas) लग्नाबाबत सर्वांना पडला आहे. अनेकदा प्रभासचं नाव या ना त्या, अभिनेत्रीसोबत जोडून लग्नाच्या चर्चा रंगवल्या जातात. पण, 45 वर्षांचा सुपरस्टार प्रभास नेमकं कुणाच्या गळ्याच मंगळसूत्र बांधणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच आहे. पण, सध्या सोशल मीडियावर (Social Media) रंगलेल्या चर्चांमुळे प्रभासला (Superstar Prabhas Getting Married?) त्याची अंर्धांगिनी सापडली की, काय? असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
लग्नाचं वय उलटून गेलेल्या प्रभासच्या लग्नाबाबत चाहत्यांना काळजी लागून राहिली आहे. चाहते कधी त्याचं नाव साऊथची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत (Anushka Shetty) जोडतात. तर, कधी त्याच्यासोबत चित्रपटात झळकलेल्या कोणत्याही अभिनेत्रीसोबत. पण, आता नाव एका वेगळ्याच अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. तशी, पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात फक्त आणि फक्त प्रभासचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यासोबत दोन इमोजी जोडले आहेत. एक इमोजी आहे ख्रिश्चन वधुचा आणि दुसरा चर्चाचा.
ट्विटरवर व्हायरल होणारी पोस्ट एका ट्रेड एनालिस्टनं केलेली आहे. त्याच्या या पोस्टमुळे प्रभासच्या लग्नाचं गूढ वाढलं आहे. आता चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. असा दावा केला जात आहे की, प्रभासची लगीनघाई सुरू झाली आहे. काही चाहते तिचे नाव 'बाहुबली'मध्ये प्रभाससोबत झळकलेली सह-अभिनेत्री अनुष्का शेट्टी असल्याचं सांगत आहे. तर, काही नेटकरी म्हणत आहेत की, अखेर ती प्रभासची नवरी बनणार आहे.
प्रभास सध्या 45 वर्षांचा आहे आणि अनुष्का शेट्टी 43 वर्षांची आहे. दोघांनी एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासूनच असे अंदाज लावले जात होते की, ते दोघे डेटिंग करत आहेत, पण त्या दोघांपैकी कुणीही, कधीही या अफवांना दुजोरा दिलेला नाही.
साऊथच्या ट्रेड एनालिस्टची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
आता ट्रेड एनालिस्ट Manobala Vijayabalan यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी फक्त प्रभासचं नाव लिहिलं आहे आणि त्यासोबतच ख्रिश्चन वधूचा इमोजी शेअर केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि चर्चांना उधाण आलं.
View this post on Instagram
युजर्सच्या कमेंट्स व्हायरल
एका युजरनं लिहिलंय की, "ख्रिश्चन वेडिंग होणार आहे का?", दुसऱ्या एकानं विचारलं की, "अनुष्का?", आणखी एका युजरनं लिहिलंय की, "मला नाही वाटत ही पोस्ट प्रभासच्या लग्नाबाबत आहे, हा प्रोमोशनल कंटेन्ट असू शकतो.", तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, "प्रभास मॅरेज सीनची शुटिंग करतोय, बाकी काही नाही."
कृति सेननसोबत जोडलं जातंय नाव?
जेव्हा कृति सेनन आणि प्रभासनं 'आदिपुरुष' फिल्ममध्ये एकत्र काम केलं होतं, तेव्हापासून त्या दोघांचं नाव एकमेकांशी जोडलं जातंय. त्यानंतर कृति सेनननं या अफवांवर रिअॅक्ट करत, सर्व अफवा असून असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :