Mumbai Police : वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करावी 'नाईट ड्यूटी', पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा आदेश
मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आता नाईट ड्यूटी करावी लागणार आहे. तसा आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिला आहे.
मुंबई: पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवीन आदेश जारी केला आहे. आता वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही 'नाईट ड्युटी' करावी लागणार. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी जारी केलेल्या आदेशानुसार पोलीस सहआयुक्तांना 15 दिवसांतून एकदा नाईट ड्युटी करवी लागणार आहे. तर अप्पर पोलीस आयुक्तांना 10 दिवसांतून नाईट ड्युटी एकदा करणार आहे. या आधी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाईट ड्यूटी नसायची.
पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आता इतक्या मोठ्या संख्येने नाईट ड्युटी करणाची ही मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे. या आधी केवळ डीसीपी स्तरावरील अधिकारी नाईट ड्युटी करायचे.
पोलीस आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार, सध्या पाच संयुक्त पोलीस आयुक्त, ज्यामध्ये लॉ अॅन्ड ऑर्डर, ट्रॅफिक, ईओडब्लू, अॅडमिन आणि पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्यामध्ये साऊथ, साऊथ सेंट्रल, इस्टर्न, वेस्टर्न आणि नॉर्थ या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नव्या नियमानुसार दर 15 दिवसांमध्ये एका पोलीस सहआयुक्त आणि दर 10 दिवसाला पोलीस अतिरिक्त आयुक्तांना नाकाबंदी, सर्च ऑपरेशन आणि पेट्रोलिंग या सारखी कर्तव्य बजावावी लागणार आहेत.
संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. त्यांनी नागरिकांशी सोशल मीडियावर संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी त्यांचा पर्सनल फोन नंबर सार्वजनिक केला आहे. तसेच मुंबईतील वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sanjay Pandey :"...म्हणून मी माझा फोन नंबर सार्वजनिक केला", मुंबई पोलीस आयुक्तांची नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा
- Mumbai Police : टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत; मुंबई पोलीस बनवणार विविध वस्तू, आयुक्त संजय पांडे यांची माहिती
- मुंबई पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला आनंद महिंद्रांचा प्रतिसाद, खटारा गाड्या हटवण्यासाठी देणार ट्रक