मुंबई पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्युटी, महिला दिनी पोलीस आयुक्तांचं गिफ्ट
Women's Day जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आजपासून मुंबई पोलीस दलातील महिलांना आठ तासांची ड्युटी असेल. घर आणि कर्तव्य यामध्ये समतोल साधता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहेत.
मुंबई : जागतिक महिला दिनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं आहे. आजपासून मुंबई पोलीस दलातील महिलांना आठ तासांची ड्युटी असेल. घर आणि कर्तव्य यामध्ये समतोल साधता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहेत. महिला दिनापासून पुढील आदेशापर्यंत महानगरात हे निर्देश लागू असतील, असे अधिकार्यांनी सोमवारी सांगितले.
योगायोगाने, याआधी राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम पाहणारे संजय पांडे यांनी या वर्षी जानेवारीत आठ तासांच्या ड्युटी शेड्यूलची सुरुवात केली होती.
"पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, महिला कर्मचार्यांसाठी दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायात, त्यांना सकाळी 8 ते 3, दुपारी 3 ते 10 आणि रात्री 10 ते सकाळी 8 अशा तीन शिफ्टमध्ये काम करावं लागेल. दुसऱ्या पर्यायामध्ये सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा शिफ्टच्या वेळा आहेत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात पोलीस अंमलदारांसाठी आठ तासांची ड्युटी सुरु केली होती. ऑन ड्युटी 24 तास असणाऱ्या पोलिसांसाठी हा सुखद निर्णय होता. परंतु कोरोना महामारीमुळे पोलिसांच्या ड्युटीचे गणित बिघडले आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे कामाचे तास सुरु झाले.
आता संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, महिला दिनाचं औचित्य साधून महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठा आणि महत्त्वाचा आदेश जारी केला. महिला दिनापासून पुढील आदेशापर्यंत सर्व पोलीस ठाण्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्युटी असेल.
महिला दिन का साजरा करतात? यंदाची थीम काय?
महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावं, त्यांच्याप्रती भेदभाव संपवण्यासाठी, त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि त्यांचा कर्तृत्वाचा अभिमान वाटावा यासाठी 8 मार्च हा दिवस जगभरात साजरा केला
यंदाच्या महिला दिनाची थीम आहे 'जेंडर इक्वॉलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो ( (Gender Equality Today for a Sustainable Tomorrow) अर्थात शाश्वत उद्यासाठी लैंगिक समानता. यानुसार समाजात आता लिंग समानता जरी दिसली, तर अजूनही समाजातील असे काही घटक आहेत जिथे महिलांना शिक्षणाचा, मोकळेपणाने बोलण्याचा, आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा हक्क मिळाला नाही. अशा घटकांत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या थीमचे आयोजन केले जातो.
महत्वाच्या बातम्या :