मुंबईत एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेसंबंधित महत्त्वाचा निर्णय घेत आदेश जारी केला आहे.
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यांतर संजय पांडे यांनी अनेक निर्णय घेतले आहे. मग तो महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे ड्युटीच्या आठ तासांचा निर्णय असो वा मुंबईत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत बांधकाम बंद करण्याचा निर्णय. पोलीस दल आणि मुंबईकरांसाठी नवनवीन उपाययोजना राबवत आहे. आता पोलीस आयुक्तांनी वृद्ध नागरिकांशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेत आदेश जारी केला आहे.
या आदेशात म्हटलं आहे की, "मुंबईत राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यांना सुरक्षा पुरवणं हे मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं काम आहे.
पोलीस आयुक्तांचं मुंबईकरांना खुलं पत्र, तक्रार करण्यासाठी दिला खासगी मोबाईल नंबर
यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार,
1. मुंबईमध्ये पोलिसांच्या बीट चौकीच्या परिसरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांची यादी तयार करुन तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला द्या आणि त्यांच्या घरी एक रजिस्टर देखील ठेवा.
2. पोलीस बीट अधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात एकट्या राहणाऱ्या वृद्धांना आठवड्यातून एक वेळा भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील. जर वृद्ध महिला एकटी राहत असेल तर महिला पोलीस कर्मचारी तिच्या घरी जाऊन विचारपूस करेल. याबाबत संबंधित वृद्धाच्या घरी ठेवलेल्या रजिस्टरमध्ये सविस्तर माहिती लिहावी आणि त्यावर सही करावी.
वाहने उचलून नेणार नाही! मुंबई पोलीस आयुक्तांचे वाहनधारकांना गोड गिफ्ट, मात्र या अटी लागू
3. संजय पांडे आदेशात पुढे म्हणाले की, "पोलीस अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीत एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची विभागणी करावी. अधिकाऱ्याच्या नावापुढे ज्या वृद्ध नागरिकाचं नाव असेल त्यांनीच त्यांची काळजी घ्यावी, जेणेकरुन त्या वृद्धांनाही पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना अवघडलेपण राहणार नाही."
4. याशिवाय, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी त्यांच्या हद्दीतील वयोवृद्ध नागरिकांसाठी नेमलेला अधिकारी योग्य प्रकारे काम करत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी अचानक भेट द्यावी. जर हे काम होत नसेल तर ते व्यवस्थितरित्या करता येऊ शकेल, असेही पांडे यांनी म्हटले आहे.
5. पांडे यांनी आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, "त्या भागातील डीसीपी किंवा एसीपी यांनीही पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कोणत्याही वृद्ध नागरिकाच्या घरी जाऊन त्यांचे अधिकारी काळजी घेत आहेत की नाही हे तपासावं लागेल."