वाहने उचलून नेणार नाही! मुंबई पोलीस आयुक्तांचे वाहनधारकांना गोड गिफ्ट, मात्र या अटी लागू
Mumbai Police: मुंबईत पार्किंगची मोठी समस्या आहे. अशातच मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्याने सतत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक कोंडी (Traffic Jam) असल्याचे चित्र पाहायला मिळत.
Mumbai Police: मुंबईत पार्किंगची मोठी समस्या आहे. अशातच मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने सतत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक कोंडी (Traffic Jam) असल्याचे चित्र पाहायला मिळतं. यातच रस्त्यांवर वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेकवेळा वाहनधारक कळत नकळत वाहने नो पार्किंगमध्ये लावतात, मग पोलीस ते टो करून घेऊन जातात. यासंदर्भातच आता मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठं पाऊल उचलत वाहनधारकांना गोड बातमी दिली आहे. संजय पांडे यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, मुंबईत वाहतूक पोलिसांकडून वाहन टोईंग थांबण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ट्विट करत म्हणाले आहेत की, ''प्रिय मुंबईकरांनो, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवित आहोत. सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा.''
प्रिय मुंबईकरांनो,
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 5, 2022
आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवित आहोत. आपण सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा!
पुन्हा वाहन टोईंग होऊ शकते सुरू?
हा निर्णय जाहीर करतानाच त्यांनी न बोलताच नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांना ईशाला दिला आहे. हा सध्या तात्पुरती स्वरूपात राबविण्यात आलेला प्रयोग असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. म्हणजेच वाहतूक पोलिसांकडून वाहने उचलणे थांबवले असूनही वाहनधारक बेशिस्तपणे रस्त्यात कुठेही वाहन पार्क करत असल्यास वाहन टोईंग पुन्हा सुरू करण्यात येऊ शकते.
दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झाल्यापासूनच संजय पांडे हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी याआधी देखील मुंबईकरांना एक खुलं पत्र लिहिलं होत. ज्यात त्यांनी मुंबईकरांना आपल्या तक्रारी सांगण्यासाठी म्हणून स्वतःचा खासगी मोबाईल नंबर दिला होता.
संबंधित बातम्या: