(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल येण्याची शक्यता असून काही दिग्गजांना पराभव पत्करावा लागू शकतो.
Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली असून त्यामध्ये अनेक धक्कादायक कल दिसून येत आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, लातूरचे दोन्ही देशमुख बंधू हे पिछाडीवर असल्याचं दिसून येतंय. ही आकडेवारी सकाळी 9.55 वाजताची असून त्यामध्ये पुढे बदल होण्याची शक्यता आहे.
कराड दक्षिणमधून लढत असलेले पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. त्या ठिकाणी भाजपचे अतुल भोसले आघाडीवर आहेत. संगमनेरमध्ये सर्वात धक्कादायक बातमी येण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे.
लातूर शहरमधून लढत असलेले अमित देशमुख हे पिछाडीवर आहेत. त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर या आघाडीवर आहेत. तर लातूर ग्रामीणमधून धिरज देशमुख हे पिछाडीवर आहेत.
तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर या पिछाडीवर असल्याचं दिसून येतंय.
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेचे वेगवान, अचूक निकाल तुम्हाला सकाळपासूनच एबीपी माझावर पाहता येणार आहेत... प्रत्येक मतदारसंघात कुणी मारली बाजी? कोण होणार तुमचा आमदार? कुणाची येणार सत्ता? काय घडामोडी घडणार? राष्ट्रपती राजवट लागणार का? कोण होणार किंगमेकर? या सर्व प्रश्नांची उत्तर, सविस्तर विश्लेषण.. तुम्हाला 'माझा'वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील.
एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.