(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला दोन तास उलटले आहेत. महायुतीने 157 जागांवर आघाडी घेतली आहे. तर ठाकरे गटाचे 41 उमदेवार आघाडीवर आहेत.
मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार महायुतीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या दीड तासात एकूण 288 विधानसभा मतदारसंघाचे कल हाती आले आहेत. सध्याच्या कलांनुसार महायुतीचे 146 उमेदवार आघाडीवर आहेत. तर मविआचे उमेदवार 132 जागांवर आघाडीवर आहेत. तर 10 जागांवर अपक्ष आणि लहान घटकपक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र, या सगळ्यात ठाकरे गटाने घेतलेली आघाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना पक्षातील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची, याची सातत्याने चर्चा सुरु होती. याचा फैसला विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. मात्र, सध्याचे चित्र पाहता ठाकरे गटाने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
राज्यातील 51 मतदारसंघांमध्य ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट लढाई आहे. सध्याच्या कलानुसार, ठाकरे गटाचे उमेदवार 42 जागांवर आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे फक्त 29 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी त्यांच्यासोबत सुरत आणि गुवाहाटीला गेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, शहाजीबापू पाटील, निलेश राणे, संजय शिरसाट हे बडे नेते पिछाडीवर आहेत. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासून मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्याकडे सध्या 5 हजारांचे मताधिक्य असल्याची माहिती आहे. तर वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शिवसेनेतील बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हे हे शिंदे गटाला बहाल केले होते. त्यामुळे अधिकृत शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी वारंवार खरी शिवसेना आमचीच असे ठासून सांगितले होते. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या किती जागा निवडून येणार, यावर शिवसेना कोणाची याचा फैसला होणार आहे.
मुंबईत कोणते उमेदवार आघाडीवर?
माहीम- अमित ठाकरे(मनसे)
वडाळा- कालिदास कोळंबकर (भाजप)
कांदिवली- अतुल भातखळकर (भाजप)
मागाठाणे- प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
दहिसर- मनीषा चौधरी (भाजप)
बोरिवली- संजय उपाध्याय (भाजप)
घाटकोपर पूर्व- पराग शाह (भाजप)
शिवडी- अजय चौधरी (ठाकरे गट)
वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई (ठाकरे गट)
मलबार हिल- मंगलप्रभात लोढा (भाजप)
आणखी वाचा